पान:श्री. ताजिकशास्त्रोक्त षोडशयोग दर्पण.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२४) इष्ट दिवसाचे चर धन असतां १५ घटिका, ५ प., यांत मिळवावे, आणि ऋण असतां १५ घटिका, ५ पळे यांत वना करावें म० दिनार्थ काल येतो. त्या दिनार्थ कालाची दुप्पट केल्याने दिनमान येते. उदाहरण. चर ६५ पळे, ३४ विपळे धन आहे या दिवसाचें दिनमान किती? चर+ ६५ ३४ दिनार्ध १६ घ०, १० पळे, ३४ विपळे दिनमान ३२ घटि, ११ पळें, ८ विपळे सायन रवीवरून उदयांतर संस्कार काढण्याची रीति व मध्यान्ह कालसाधन. उदयांतर कोष्टकांत वरच्या बाजस डावीकड़न क्रमाने सायन रवीच्या मेष, वृषभ वगैरे क्रमाने बारा राशि देऊन या राशीच्या डावीकडील १ ल काष्टकात वरून खाली ०,१.२. अशा क्रमाने राशीचे त्रिशांश कोष्टक दिले आहे. इष्ट दिवसाचा सायनरवि व त्याचे अंश यांचे समान रेषा काष्टकाताल जे अंक असतील तितकी पळे + म० धन; आणि - म० ऋण; जाणावीत; ही पळे १५ घटिकेत धन ( मिळविल्याने): किंवा ऋण ( वजा) केल्यानं मध्यान्हकाल येतो. उदाहरण. सायन रवि ३ रा..१९ अं०. असतां मध्यान्हकाल किती? ३ राशि, आणि १९ अंश याचे समान रेषा कोष्टकांत १२ पळे+ आहेत. घ. पळे १५० +१२ १५३०, १२ पळे मध्यान्हकाल झाला.