पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Kaalhlilrlite व्यवस्थापक- पं. चकचरजोर सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. मंगलाचरण. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥ हर्ता आपत्तींचा, दाता निखिलार्थसिद्धिंचा तेवीं। श्रीराम लोकनंदन, तच्चरणां नित्य नित्य मी सेवीं ॥ १. अकुर्वन्तोऽपि पापानि शुचयः पापसंश्रयात् । परपापैविनश्यन्ति मत्स्या नागहदे यथा ॥३॥३८।२६ शुचिर्भूत व स्वतः पाप करणारे नसूनही जे पाप्यांचा आश्रयः करितात, ते सर्पयुक्त डोहांत वास करणारे मासे नाश पावतात, त्याप्रमाणे त्या दुसऱ्यांच्या पापांनी नाश पावतात. २. अकृतात्मानमासाद्य राजानमनये रतम् । समृद्धानि विनश्यन्ति राष्ट्राणि नगराणि च ॥५।२१।११ ज्याच्या चित्ताला ज्ञानाचा संस्कार नाही, व जो अनीतीचे ठायीं आसक्त झालेला आहे, अशा राजाची प्राप्ति झाली असतां समृद्धही राष्ट्र आणि नगरें नाश पावतात. ३. अग्निं प्रज्वलितं दृष्ट्रा वस्त्रेणाहर्तुमिच्छसि । कल्याणवृत्तां यो भायर्या रामस्याहर्तुमिच्छसि॥३।४७।४३ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri