पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. श्रीमंत असो, वा दरिद्री असो; सुखी असो वा दुःखी असो; निर्दोष असो,, वा सदोष असो, मित्र म्हणजे परम गति होय. ५७. आत्मप्रशंसिनं दुष्टं धृष्टं विपरिधावकम् । सर्वत्रोत्सृष्टदण्डं च लोकः सत्कुरुते नरम् ॥६।२१।१५ आत्मप्रशंसा करणारा, दुष्ट आचरणाचा, साहसी, आपल्या प्रसिद्धीकरितां धावपळ करणारा, व सर्वत्र दंड करीत जाणारा, अशाच पुरुषाचा लोक. सत्कार करितात. ५८. आत्मानं नियमैस्तैस्तैः कर्षयित्वा प्रयत्नतः । प्राप्यते निपुणधर्मो न सुखाल्लभते सुखम् ॥ ३।९।३१ ( धर्मसंपादनार्थ जे जे नियम सांगितले आहेत ) त्या त्या नियमांच्या योगेंकरून प्रयत्नांनी शरीर झिजवून शहाणे लोक धर्माची प्राप्ति करून घेतात. कारण, सुखापासून सुख मिळत नसते. ५९. आत्मानमनुशोच त्वं किमन्यमनुशोचसि । आयुस्तु हीयते यस्य स्थितस्याथ गतस्य च।२।१०५।२१ तूं आपल्याविषयीं शोक कर. दुसऱ्याविषयी काय म्हणून शोक करितोस ? कोणी मनुष्य, मग तो येथें स्थित असो, किंवा परलोकी गेलेला असो, त्याचें आयुष्य क्षीण होत असते. ६०. आत्मा रक्ष्यः प्रयत्नेन ॥ ५।४६।१६ (प्रत्येकानें ) प्रयत्नपूर्वक स्वदेहाचे रक्षण करावें. ६१. आत्मा हि दाराः सर्वेषांदारसंग्रहवर्तिनाम् ॥२।३७।२४ सर्व विवाहित पुरुषांच्या दारा ( स्त्रिया ) ह्या त्यांचे आत्मेच आहेत. ६२. आनृशंस्यं परो धर्मः ॥ ५॥३८॥३९ (प्राणिमात्रावर ) दया करणे हाच श्रेष्ठ धर्म होय. ६३. आभिजात्यं हि ते मन्ये यथा मातुस्तथैव च । न हि निम्बात्स्रवेत्क्षौद्रं लोके निगदितं वचः।।२।३५।१७ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri