पान:श्रीसार्थरामायणसुभाषितानि.djvu/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सार्थ श्रीरामायणसुभाषितानि. wa मी राजाच्या सांगण्यावरून अग्नीत देखील पतन पावेन; हितकर्ता गुरुमाझा बाप ( दशरथ ) राजा, याने आज्ञा केली असतां मी तीक्ष्ण विषाचें भक्षण करीन, किंवा समुद्रांतही उडी घेईन. ५१. अहितं च हिताकारं धाष्टोज्जल्पन्ति ये नराः । अवश्यं मन्त्रबाह्यास्ते कर्तव्याः कृत्यदूषकाः॥६।६३।१६ जे कोणी वस्तुतः अहितप्रद, परंतु बाहेरून हितकारक वाटण्याजोगें भाषण धाष्टानें करितात, ते कार्यनाशक होत. त्यांस आपल्या विचारांत-सल्लामसलतींतघेऊ नये. ५२. अहिरेव अहेः पादान्विजानाति न संशयः॥५।४२।९ सर्पाचे पाय-चरणरहित गति-सर्पच जाणतो, यांत संशय नाही. ५३. अहो तम इवेदं स्यान्न प्रज्ञायेत किंचन । राजा चेन्न भवल्लोके विभजन्साध्वसाधुनी ॥२।६७।३६ चांगले आणि वाईट यांची निवड करणारा राजा जर पृथ्वीवर नसेल, तर सर्वच अंधार होईल, आणि ( कार्याकार्य ) काहीच समजणार नाही. ५४. अहोरात्राणि गच्छन्ति सर्वेषां प्राणिनामिह । आयूंषि क्षपयन्त्याशु ग्रीष्मे जलमिवांशवः॥२।१०५।२० ग्रीष्म ऋतूंत जलांचा नाश करणाऱ्या (सूर्य) किरणांप्रमाणे या मृत्युलोकी निघून जाणाऱ्या दिवसरात्री सर्व प्राण्यांच्या आयुष्याचा शीघ्र नाश करितात. ५५. आकारश्छाद्यमानोऽपि न शक्यो विनिगुहितुम् । बलाद्धि विवृणोत्येव भावमन्तर्गतं नृणाम् ॥६।१७।६४ मनुष्याने आपला आकार-हर्षविकारादि मनोभावनांनी चेहऱ्यावर होणारा फेरफार-आंवरून धरण्याचा कितीही फेरफार केला, तरी तो आंवरतां येत नाही. तो आकार मनुष्यांचा अंतर्गत ( चांगला वाईट ) भाव कशाना कशा प्रकारे प्रगट करितोच. ५६. आढ्यो वापि दरिद्रो वा दुःखितः सुखितोऽपि वा। Pा निर्दोषश्च सदोषश्च वयस्यः परमा गतिः॥४८८ CC-O Pt. Chakradhar Joshi and Sons, Dev Prayag. Digitized by eGangotri