पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः ॥ २॥ इतरत्र संन्यासाचे म्हणून जे वर्णन आहे तेथे फक्त फलाशेचा 'त्याग' करून (गी. १९११) सर्व कर्माचा परमेश्वराचे ठायीं 'संन्यास' म्हणजे अर्पण करा असे त्यांनी सांगितले आहे (३.३०:२.६); आणि उप- निपदांत पहावे तर 'न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनके अमृतत्व- मानशुः (कै. 1. २) नारायण. ( १२.३) सर्व कर्माचा स्वरूपत: , 'त्याग' करूनच कियेकांनी मोक्ष मिळविला,-किंवा "वेदान्तविज्ञान- सुनिश्चितार्थाः संन्यासयोगाद्यतयः शुद्धतत्त्वाः ” (मुंडक ३.३.६) कर्मत्यागरूपी 'संन्यास' योगाने शुद्ध झालेले 'यति'--अथवा किं प्रजया करिष्यामः' (बृ. ४.३.१२)-आम्हांला पुत्रपौत्रादिक प्रजा काय करावयाची!-अशी कर्मत्यागपर संन्यासधर्माची वचने आढळन येतात. • अथात् भगवान् 'त्याग' ब 'संन्यास' हे दोन शब्द स्मृति ग्रंथांतून प्रतिपादन केलेल्या चार आश्रमांपैकी कर्मत्यागरूप संन्यासाश्रमास न लावितां दुसऱ्या कोणत्या तरी अर्थाने त्या शब्दांचा उपयोग करीत आहेत अशी अर्जुनाची समजूत झाल्याने, त्याचा पूर्ण खुलासा व्हावा म्हणून त्याने हा प्रश्न विचारिला आहे. गीतारहस्य प्रकरण अकरा (पृ. ३४४-३४७) यांत याचे सविस्तर विवेचन आहे ते पहा. ] श्रीभगवान् म्हणाले--(२) काम्य (म्हणून जेवढी) कम स्यांचा न्यास म्हणजे सोडणे याला शहाणे लोक संन्यास असे समजतात; (व) सर्व कर्माच्या फलांचा त्याग करणे याला पंडित त्याग असें म्हणतात. । [कर्मयोगमागांत संन्यास व त्याग कशाला म्हणावयाचे ते या श्लोकांत स्पष्ट सांगितले आहे. पण संन्यासमार्गीय टीकाकारांस हे मत ग्राह्य नसल्यामुळे त्यांनी या श्लोकाची बरीच ओढाताण केली आहे. श्लोकांत प्रथमच 'काम्य' हा शब्द आला आहे. म्हणून मीमांसकांचे निस्य, नैमित्तिक, कास्य व निषिद्ध, इ. कर्माचे भेद या ठिकाणी विव-