पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोता, भाषान्तर व टीपा-अध्याय १८. ३२३ -- - - - - - - - - - - - - - - - - H$ त्याज्यं दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः। क्षित असून पैकी काम्य तेवढी " कर्मे सोडावी असा भगवंतांचा उप- देश आहे असे या टीकाकारांचे म्हणणे आहे. परंतु संन्यासमार्गातील लोकांस नित्य आणि नैमित्तिक कर्माचा समावेश काम्य कर्मातच येथे केलेला आहे, असे प्रतिपादन करावे लागत आहे. इतके झाले तरी या श्लोकाच्या दुसन्या अर्थात फलाशा सोडावी, कर्म सोडूं नयेत, असें जें हटले आहे (पुढे सहावा श्लोक पहा) त्याची संगति लागत नसल्या- मळे, अखेर कर्मयोगमागांची भगवंतांनी ही पोकळ स्तुती केली आहे भगवंतांचा खरा अभिमाय कमें सोडावी असाच आहे, असा आपल्या पदरचाच शेरा मारून या टीकाकारांनी आपले समाधान करून घेतले आहे ! संन्यासादि सांप्रदायिक दृष्टीने या श्लोकाचा अर्थ नीट लागत नाही, हे यावरून उघड होते. त्याचा खरा अर्थ कर्मयोगपर म्हणजे फलाशा सोडून आमरणान्त सर्व कर्मे करण्याचे जें तस्व पूर्वी गीतेत अनेक वेळा सांगितले आहे त्याच्याच अनुरोधाने लाविला पाहिजे; व तो सरळ लागतोहि. 'काम्य' शब्दाने मीमांसकांचा नित्य, नैमि- त्तिक, काम्य व निषिद्ध, हा कर्मविभाग या ठिकाणी अभिप्रेत नाही. हे प्रथम लक्षात ठेविले पाहिजे. कर्मयोगमार्गात सर्व कर्माचे 'काम्य' म्हणजे फलाशा धरून केलेली, आणि 'निष्काम' म्हणजे फलाशा सोडून केलेली, असे दोनच वर्ग करीत असतात; व मनुस्मृतीत त्यांस अनु. क्रमें 'प्रवृत्त कर्म व 'निवृष' कर्म अशी नांवे दिलेली आहेत (मनु. १२.८८ व ८५ पहा). कम निस्य असोत, नैमित्तिक असोत, काम्य असोत, कायिक असोत, वाचिक असोत, मानसिक असोत, अथवा सास्विकादि भेदाने दुसन्या कोणत्याहि प्रकारची असोत, ती सर्व काम्य' आणि निष्काम,' या दोन वर्गीपैकी कोणत्या तरी एका कोटीत आ- लीच पाहिजेत. कारण, काम म्ह० फलाशा असणं किंवा नसणे, या दोहाव्यतिरिक्त फलाशेच्या दृष्टीने तिसरा भेद संभवत नाही. ज्या