पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः । मोहाद्गृहीत्वाऽसद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचित्रताः ॥१०॥ चिंतामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः । कामोपभोगपरमा एतावदिती निश्चिताः ॥११॥ आशापाशतैर्वद्धाः कामक्रोधपरायणाः । ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंचयान् ॥ १२ ॥ इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् । इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ १३॥ असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि । ईश्वरोऽहमह भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १४ ॥ आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो भया। यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः॥१५॥ (१०) (आणि) कधीच पुरा न होणाऱ्या कामाचा म्हणजे विषयोपभोगे. च्छेचा आश्रय करून दंभ, मान, व मद यांनी व्यापिलेले हे (आसुरी लोक) मोहाने खोटेनाटे ग्रह म्हणजे भलभलत्या कल्पना (मनांत) धरून घाणेरडी कामे करण्यास प्रवृत्त होत असतात, (११)तसेच आमरणान्त (सुखोपभोगाच्या) अगणित चिंतेने ग्रासलेले, कामोपभोगांत गढून गेलेले आणि तेच काय ते सर्वस्व असें निश्चयाने मानणारे, (१२) शेंकड़ों आशा- पाशांनी बद्ध झालेले, कामक्रोधपरायण होत्साते (हे आसुरी लोक) सुखो- पभोगार्थ अन्यायाने पुष्कळ अर्थसंचय करण्याची हांव बाळगत असतात. (१३) मी आज हे मिळविले, (उद्यो) तो मनोरथ प्राप्त करून घेईन, हे धन (मजजवळ) आहे, आणि पुनः तेंहि माझं होईल; (0) हा शत्र मारिला, आणि दसेरह मारीन: मी ईश्वर, मा (1) उपभोग घेणारा, मी सिद्ध, बलाढ्य आणि सुखी, (१५)मी पन्न व कुलवान, माझ्यासारखा दुसरा आहे कोण ? मी यज्ञ करीन,