पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०५ गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १६. अनेकचित्तविभ्रांता मोहजालसमावृताः । प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥१६॥ आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः। यजन्ते नामयस्ते दंभेनाविधिपूर्वकम् ॥ १७ ॥ अहंकारं बलं दर्प काम क्रोधं च संश्रिताः। मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः।। १८॥ तानहं द्विषतः ऋरान्संसारेषु नराधमान : क्षिपाम्यजत्रमशुभानासुरीप्येव योनिषु ॥ १९ ॥ आसुरी योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि । मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥ २०॥ मी दान देईन, मी चन करीन, याप्रमाणे अज्ञानाने मोहपालले, (१६) अनेक प्रकारच्या कल्पनांनी भ्रमलेले, मोहाच्या जाळ्यांत गुरफटलेले, आणि विषयोपमोगांत आसक्त झालेले, (हे आसुरी लोक) घाणेरड्या नरकांत पडतात : (१७) आत्मश्लाघी, ताट्याने वागणारे, व धन आणि मान यांच्या मदाने युक्त असलेले, हे (आसुरी लोक) दांभिकपणाने शास्त्रविधि सोडून देऊन केवळ नांवाचे यज्ञ करीत असतात. (१८) अहं- कारान, बलाने, दर्पाने, कामाने व क्रोधाने फुगून जाऊन आपल्या स्वतः च्या व इतरांच्या देहांत असणारा जो मी (परमेश्वर) त्याचा द्वेष कर- णारे, (आणि) निंदक, (१९) अशुभ कर्मे करणान्या (या) द्वेष्ट्या व कर नराधमांस (या) संसारांतील आसुरी म्हणजे पापयोनीतच मी नेहमी टाकीत असतो. (२०) हे कौतया! (याप्रमाणे) जन्मोजन्म आसरी योनिच प्राप्त होऊन, हे मूर्ख लोक माझ्याकडे कधीच न येतां अखेर अत्यंत अधोगतीला जातात. । आसुरी लोकांचे व त्यांस प्राप्त होणा-या गतीचे हे वर्णन शाले. आतां यांतून सुटावे कसे ते सांगतात.-] गी. र. १९