पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. $$ यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् । स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १९ ॥ इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ । पतवुवा बुद्धिमान् स्यात्कृतकृत्यश्च भारत ॥ २० ।। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्यार्जुन- संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः ॥ १५॥ होणारे मूलतत्त्व जे अक्षरब्रह्म तेंच क्षेत्रक्षेत्रज्ञविचाराचेहि पर्यवसान होय, किंवा " पिंडी व ब्रह्मांडी" मिळून एकच पुरुषोत्तम आहे असे सिद्ध होते. तसेंच अधिभूत, अधियज्ञ इत्यादिकांतील किंवा जुन्या पिंपळांतीलहि तत्व हेच होय असेंहि सांगितले आहे. जगांतील हे ऐक्य ज्याने ओळखिले आणि "सर्वांभूनी एक आत्मा" (गी. ६.२९) ही ओळख ज्याच्या मनांत मरेपर्यंत कायम राहिली (चे. सू. ४.१.१२; गी. ८.६), तो कर्मयोग आचरीत असतांच परमेश्वरप्राप्ति करून घेतो हा या ज्ञानविज्ञान प्रकरणाचा अखेर निष्कर्ष आहे. कमें न करितां केवळ परमेश्वरभक्तीने मोक्ष मिळत नाही असे नाहीं; पण गीतेतील ज्ञानविज्ञाननिरूपणाच ते तात्पर्य नसून ज्ञानाने किंवा भक्तीने परिपत झालेल्या निष्काम बुद्धीने सर्व सांसारिक कर्मे करावी, व ती करीत असतांच मोक्ष कसा मिळतो, हे दाखविण्यासाठीच ज्ञान- विज्ञानाच्या या निरूपणास सुरवात केलली आहे, असें सातव्या अध्यायाच्या आरंभीच म्हटले आहे. असो; आतां हैं जाणिल्याने काय फल मिळते ते सांगतात-] (१९) याप्रमाणे भी पुरुषोत्तम है मोह न पावतां जो जाणितो, तो सर्वज्ञ होत्साता सर्वभावेकरून हे भारता ! मलाच भजतो (२०) हे निष्पाप भारता! असे गुह्यांतले गुह्य शास्त्र मी सांगितले. हे समजून घेतल्याने (मनुष्य ) बुद्धिमान् म्हणजे बुद्र किंवा जाणता आणि कृतकृत्य होईल.