पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/३११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय १६. षोडशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच । अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः । बुद्धिमान् याचाच बुद्ध म्हणजे जाणता असा येथें अर्थ आहे। कारण भारतांत (शां. २४८.११) याच अर्थी 'बुद्ध' व 'कृतकृत्य' हे शब्द आलेले आहेत. 'बुद्ध' या शब्दाचा 'बौद्धावतार' हा रूढार्थ महाभारतांत कोटेंच आलेला नाही. गीतार. परि. पृ.

५५६ पहा.]

याप्रमाणे श्रीभगवंतांनी गाईलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदांत ब्रह्मविद्यान्तर्गत योग-म्हणजे कर्मयोग-शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील पुरुषोत्तमयोग नांवाचा पंधरावा अध्याय समाप्त झाला. अध्याय सोळावा. [ पुरुषोत्तमयोग ही क्षराक्षरज्ञानाची परमावधि झाली; व खरे म्हटले म्हणजे कर्मयोग आचरीत असता त्यानेच परमेश्वराचे ज्ञान होऊन मोक्ष कसा मिळतो हे दाखविण्यासाठी सातव्या अध्यायापासून जे ज्ञानविज्ञान सांगण्यास सुरवात केली ते येथे संपून आतां उपसंहार करावयास पाहिजे परंतु नवव्या अध्यायांत (१.१२) राक्षसी मनुष्ये माझें अव्यक्त व श्रेष्ठ स्वरूप ओळखीत नाहीत असे जे भगवंतांनी नुस्ते संक्षिप्त विधान केले आहे त्याचे स्वरूप सांगण्यासाठी या अध्यायास सुरवात केली आहे; आणि मनुष्यामनुष्यांत असे भेद का होतात याचे कारण पुढील अध्यायांत सांगितल्यावर, अठराव्या अध्यायांत सर्व गीतेचा उपसंहार केला आहे.