पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ श्रीमद्भगवद्गीता. संजय उवाच । एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः । दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम् ॥ ९ ॥ अनेकवक्त्रनयनमेनका दुतदर्शनम् । अनेकदिव्याभरणं दिव्याने कोद्यतायुधम् ॥ १० ॥ दिव्यमाल्यांबरधरं दिव्यगंधानुलेपनम् । सर्वाश्चयेमयं देवमनंतं विश्वतोमुखम् ॥११॥ दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदास्थता। यदि भा सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२॥ तत्रस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा । अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा ॥ १३ ॥ ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः । संजय म्हणाला-(९) याप्रमाणे बोलल्यावर मग हे राजा धृतराष्ट्रा ! योगांचा मोठा ईश्वर जो हरि त्याने अर्जुनाला (आपलें) श्रेष्ठ ईश्वरी रूप म्हणजे विश्वरूप दाखविले. (१०) त्याला म्हणजे त्या विश्वरूपाला अनेक सौ. व डोळे असून त्यांत अनेक अभ्दुत देखावे दिसत होते; (ब) स्यावर अनेक प्रकारचे दिव्य अलंकार असून स्यांत अनेक प्रकारची दिव्य आयुधे उभारलेली (चमकत) होती. (११) त्या अंनत, सर्वतोमुख व सर्व आश्चर्यानी भरलेल्या देवास दिव्य सुगंधाची उटी लाविली होती, व त्याने दिव्य पुष्य व वस्त्र धारण केलेली होती. (१२) आकाशांत एक हजार सूर्याची प्रभा जर एकदम उठेल, तर ती त्या महात्म्याच्या कान्तीसारखी (काहींशी) दिसेल ! (१३) देवदेवाच्या या शरीरांत नानाप्रकारे विभाग. लेले सर्व जग एकत्र झाले आहे असें अर्जुनाच्या तेव्हां दृष्टीस पडले.(१४) मग आश्चर्याने थक्क होऊन त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि शिरसा नमस्कार करून व हात जोडून तो अर्जुन देवाला म्हणाला की-