पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ११. २३॥ पश्यादित्यान्वसून् रुद्रानश्चिनौ मरुतस्तथा । बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥६॥ इहैकस्थं जगत्कृस्तं पश्याद्य सचराचरम्। मम देहे गुडाकेश यच्चान्यद्रष्टुमिच्छसि ।। ७ ।। न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा । दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम् ।। ८॥ (६) हे पहा, (बारा) आदित्य, (आठ) वसु, (अकरा) रुद्र, (दोन) अश्वि- नीकुमार, तसेंच (एकुणपन्नास) मरुद्गण ! हे भारता! पूर्वी कधीहि न पाहिलेली अनेक आश्चर्य पहा. नारायणीय धर्मात नारदाला जे विश्वरूप दाखविले स्यांत बारा . आदित्य डाव्या बाजूस, पुढच्या भागी आठ वसु, उजव्या बाजूस अ. करा रुद्ध, आणि पाठीमागच्या बाजूस दोन अश्विनी कुमार, असें वि. शेष वर्णन आहे (शां. ३३९.५०-५२). परंतु हेच सर्वत्र विवक्षित आहे असे दिसत नाही (म. भा. उ. १३० पहा). आदित्य, वसु, रुद, अश्वि- नीकुमार आणि मरुद्गण या देवता वैदिक असून त्यांत आदित्य है क्षत्रिय, मरुद्गण हे वैश्य व अश्विनीकुमार हे शूद्र असा देवांच्या चातु- वाचा भेद महाभारतांत (शां. २०८.२३, २४) सांगितला आहे. शतपथमाह्मण १४. ४.२.२३ पहा.] (७) हे गुसाकेशा ! आज येथे एकत्र झालेले सर्व चराचर जग आणि दुसरेंहि जे काय तुला पाहण्याची इच्छा असेल ते माश्या (या) देहांत पाहून घे! (6) परंतु सुझ्या याच दृष्टीने मला तूं पाहूं शकणार नाहीस, तुला मी दिव्यदृष्टि देतो; (तिने ) माझा हा ईश्वरी योग म्ह० योगसामर्थ्य पहा!