पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. साधुरेव स मंतव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३० ॥ क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्ति निगच्छति । कौतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ३१ ॥ मां हि पार्थ व्यापाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः । खियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥३२॥ किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा। असतो. (३०) मोठा दुराचारी का असेना, मला जर तो अनन्यभावाने भजत आहे, तर तो साधुच समजला पाहिजे. कारण त्याच्या बुद्धीचा निश्चय चांगला झालेला असतो. (३१) तो लवकर धर्मात्मा होतो व निस्य शान्ति पावतो. हे कौतया तूं असें पक्के समज की, माझा भक्त (कधीहि) नाश पावत नाही. भगवद्भक्त दुराचारी असले तरी भगवंताला प्रियच असतात असा तिसाव्या श्लोकाचा अर्थ समजावयाचा नाही. भगवान् एवढेच सांगतात की प्रथम एखादा मनुष्य दुराचारी असला तरी एकदा त्याची बुद्धि निश्चयाने परमेश्वराकडे वळली म्हणजे त्याचे हातून पुढे कोणतेहि दुष्कर्म होणे शक्य नाहीं; आणि मग तो हळूहळू धर्मात्मा होऊन सिद्धि पावती व या सिद्धीने त्याच्या पापाचा अखर पूर्ण नाश होतो. सारांश, सहाव्या अध्यायांत (६.४४) कर्मयोग जाणण्याची नुसती इच्छा झाली तरी चर. कांत घातल्याप्रमाणे अवश होऊन मनुष्य शब्दब्रह्मापलीकडे जातो असा सिद्धान्त केला आहे, तोच आतां भक्तिमामाला लागू करून दाख. विला आहे. परमेश्वर सर्व भूनांना सारखा कसा याचीच आतां जास्त फोड करितात- (३२) कारण, हे पार्थी ! गाझा आश्रय करून खिया, वैश्य व शूद, सिंघा (अंत्यजादि-)जे पापयोगि असतील ते देखील परमगति पावतात.