पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । । सांगते तो गेल्या अध्यायांत प्रतिपादिलेला कर्मयोगच होय याबद्दल काही शंका रहात नाही. विज्ञान याचा अर्थ अनुभविक अमज्ञान किंवा ब्रह्मसाक्षात्कार असा कित्येक करितात, पण वर सांगितल्याप्रमाणे पर- मेश्वरज्ञानाचेच समष्ठिरूप (ज्ञान) आणि व्यष्टिरूप (विज्ञान) दोन भेद असल्यामुळे तेच ज्ञानविज्ञान शब्दानेहि अभिप्रेत आहेत असे आह्मांस वाटते (गी, ३.३० व १८.२० पहा). दुसन्या श्रीकांतील " पुनः दुसरें कांहीं जाणावयाचें शिल्लक रहात नाही" हे शब्द उपनिषदाच्या आधारे घेतलेले आहेत. छांदोग्योपनिषदांत श्वेतकेतला स्याच्या बापाने "येन...अविज्ञातं विज्ञातं भवति" "जें एक जाणिल्याने सर्व जाणिले जाते ते काय ?" असा प्रश्न करून पुढे " यथा सोम्यकेन मृत्पिडेन सर्व मृण्मयं विज्ञातं स्यावाचारंभणं विकारो नामधेनं मृत्तिकेत्येव सत्यम् (छां. ६.१.१)-ज्याप्रमाणे बाबा ! एका मार्ताच्या गोळ्यांत काय आहे ते कळले म्हणजे बाकी मृण्मय पदार्थ त्या मृत्तिकैचेच निरनिराळी नामरूपें धारण करणारे विकार होत दुसरें कांहीं नाहीं"-स्याप्रमाणे ब्रह्म जाणिल्याने दुसरे काही जाणाद- याच रहात नाही-अशी त्याची फोड केली आहे आणि मुंडकोनिषदांतहि (मु. १.१.३) "कस्मिन्नु भगवो विज्ञातं सर्वमिदं विज्ञातं भवति"-कशाचे ज्ञान झाले झणजे इतर सर्व वस्तूंचे ज्ञान होते ?-- असा आरंभीच प्रश्न आहे, यावरून एका परमेश्वराचे ज्ञान- विज्ञान झाले म्हणजे या जगांत दुसरे काही जाणाक्याचे शिल्लक रहात नाही, कारण या जगांतील मूलतत्व एकच असून तेच नामरूपभेदानें सर्वत्र भरले आहे, त्याखेरीज दुसरी वस्तु जगांत नाही, असें जें अद्वैत वेदान्ताचे तत्व तेच येथेहि अभिप्रेत आहे असे दिसून येते; एरवीं दुसऱ्या श्लोकांतील प्रतिज्ञा सार्थ होत नाही.] - - - - - - - - -