पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता. अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७॥ कश्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति । अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मगः पथि ॥ ३८ ॥ पतन्मे सशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः। त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥ ३९ ॥ अर्जुन म्हणाला-(३७) हे कृष्णा! श्रद्धा आहे पण अयति म्ह. (प्रकृतिस्वभावामुळे) पुरासा प्रयत्न किंवा संयमन होत नाही, म्हणून ज्याचें मन ( साम्यबुद्रिरूप कर्म-) योगापासून चलित झाले, तो योगसिद्धि न पावतां कोणत्या गतीला जातो? (३८) हे महाबाहो श्रीकृष्णा! मोहग्रस्त होऊन ब्रह्म पाप्तीच्या मार्गात स्थिर न झाल्याने दोहों- कडून भ्रष्ट म्हणजे सुटलेला हा पुरुष फुटलेल्या ढगाप्रमाणे (मधल्यामध्येंच) नाश तर पावत नाही ना? (३९) हे कृष्णा? माझा हा संशय तुम्हीच निःशेष दूर केला पाहिजे; या संशयाचे निरसन करणारा तुम्हां- वांचून दुसरा कोणी मिळणार नाही. । [नन् समासांत आरंभीच्या नञ् (अ) या पदाचा 'अभाव' असा जरी सामान्य अर्थ असला तरी अल्पार्थीहि पुष्कळदा त्याचा प्रयोग होत असल्यामुळे ३७ व्या श्लोकांतील 'अयति' या शब्दाचा अर्थ " अल्प म्हणजे अपुरा प्रयत्न किंवा संयमन करणारा " असा होतो. ३८ व्या श्लोकांत " दोहोकडचा आश्रय सुटलेला " किंवा " इतो भ्रष्टस्ततो भ्रष्टः " असे जे म्हटले आहे त्याचा अर्थहि कर्मयोगपरच केला पाहिजे. काम्य बद्धीने पण शास्त्राज्ञेप्रमाणे कर्म केलें तर स्वर्गप्राप्ति होते आणि निष्काम बुद्धीने केले तर त्याचे बंधन न लागतो मोक्षप्राप्ति होते, अशी कर्माची दोन फलें आहे. परंतु या अर्ध- वट मनुष्यास कर्माचे स्वर्गादि काम्य फल मिळत नाही, कारण ससा हेतु नसतो; आणि साम्यबुद्धि पूर्णवेस आलेली नसल्यामुळे त्यास मोक्ष - - - - - - - - - - - - - - - - - -