पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ६, १५३ श्रीभगवानुवाच । . पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ॥ न हि कल्याणकरकश्चिदुर्गतिं तात गच्छति ॥ ४० ॥ प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः। शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥४१॥ अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् । एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥ ४२ ।। मिळणेंहि शक्य नसते. म्हणून स्वर्ग गेला आणि मोक्षहि गेला-तेल गेले, तूप गेले आणि धुपाटणे हाती आले-अशी उभयत्र मुकल्याप्रमाणे त्याची स्थिती होते की काय, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. हा प्रश्न केवळ पातंजलयोगरूपी कर्मयोगाच्या साधनासच लागतो असे नाही. कर्म- योगसिद्धयर्थ लागणारी साम्यबुद्धि कधी पातंजल योगाने तर कधी भक्तीने आणि कधी ज्ञानाने प्राप्त होते, असे पुढील अध्यायांतून वर्णन आहे; आणि पातंजल योग हे साधन एकाच जन्मांत अपुरे रहाण्याचा जसा संभव आहे, तसेच कोणी भक्ति किंवा ज्ञान या साधनांचा अंगी- कार केल्यास तीहि एक जन्मांत अपुरी रहाण्याचा संभव आहे. म्हणून अर्जुनाच्या वरील प्रश्नास भगवंतांनी दिलेले नुत्तर कर्मयोगमार्गातील सर्वच साधनांस सामान्यतःच लागू आहे असे म्हटले पाहिजे.] श्रीभगवान् म्हणाले-(४०) हे पार्थ! इहलोकी काय आणि परलोकी काय अशा पुरुषाचा कधीच विनाश होत नाही. कारण कल्याणकारक कमें करणाच्या कोणत्याहि पुरुषास बाबा! दुर्गति मिळत नाही. (४१) पुण्य. कमे करणाऱ्या पुरुषांना मिळणान्या (स्वर्गादि) लोकांमत पोंचून व (तेथें) पुष्कळ वर्षे वास करून मग हा योगभ्रष्ट म्ह. कर्मयोगापासून भ्रष्ट झालेला पुरुष शुचिर्भूत श्रीमान् लोकांच्या घरी जन्म घेतो. (४२) किंवा