पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवीता. FF ज्ञानेन तु तदशानं येषां नाशितमात्मनः । तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम् ॥ १६ ॥ तबुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः । गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिधूतकल्मषाः ॥ १७ ॥ शानावर अज्ञानाचे पांघरून पडले असल्यामुळे (म्ह० मायेनें ) प्राणी मोह पावतात. । [या दोन श्लोकांतले तत्व मूळच सांख्यशास्त्रांतले असून (गीतार पृ. १६१, १६२ पहा, वेदान्यांच्या मते आस्मा-परमेश्वर असल्यामुळे आत्मा अकर्ता हे तत्व वेदान्ती परमेश्वरासहि लावितात. सांख्य प्रकृति व पुरुष अशी दोन मूलतत्वें मानून सर्व कर्तस्व प्रकृतीचे व आत्मा उदासीन मानितात. पण बेदान्ती त्याच्या पलीकडे जाऊन या दोहों- हि मूळ एक निर्गुण परमेश्वर असून तो सांख्यांच्या आत्म्याप्रमाणे उदासीन व अकर्ता आहे, आणि सर्व कर्तृत्व मायेचे (म्हणजे प्रकृतीचे) आहे, असे मानितात (गीतार. पृ. २६४). सामान्य मनुष्यास या गोष्टी अज्ञानामुळे कळत नाहीत. पण कर्मयोगी कर्तृत्वाकर्तृत्वाचा हा भेद जाणणारा असल्यामुळे तो कर्मे करूनहि अलिप्तच रहातो, असे आतां सांगतात- (१६)पण ज्यांच्या स्वतःचे है अज्ञान ज्ञानाने नष्ट झाले त्यांना सूर्याप्रमाणे त्याचे ज्ञान परमार्थतत्त्व प्रकाशित करून देते. (१७) आणि त्या परमार्थतत्वांतच ज्यांची बुद्धि रंगली, तेथेच ज्यांचे अंतःकरण रमले व तनिष्ट व तत्परायण झाले, त्यांचे पाप ज्ञानाने नि:शेष धुऊन ते पुनः जन्मास येत नाहीत, याप्रमाणे ज्यांचे अज्ञान नष्ट झाले स्या कर्मयोग्याच्या (संन्याश्याच्या नव्हे) ब्रह्मभूत किंवा जीवन्मुक्त अवस्थेचे आतां अधिक वर्णन करितात-