पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- - - - - - - - - गीता, भाषान्तर व टीपा-अध्याय ४. ९ भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३॥ या तिन्ही श्लोकांत 'योग' पा एकेरी शब्दाने सांख्य आणि योग या दोन आयुष्यक्रमणाच्या मागाँपैकी योग म्हणजे कर्मयोग, अर्थात् साम्यबुद्धीने कमें करण्याचा मार्ग, हाच अर्थ अभिप्रेत आहे, असे गीतारहस्याच्या तिस-या प्रकरणांत (पृ. ५६-६५) आम्ही सिद्ध केले आहे. गीतेतील या मार्गाची जी परंपरा वरील श्लोकांत सांगितली आहे ती या मार्गाचे मूळ समजण्यास अत्यंत महत्वाची असताहि टीकाकारांनी स्याची विशेष चर्चा केलेली दिसत नाही. महाभारतान्तर्गत नारायणी- योपाख्यानांत भागवतधर्माचे जे निरूपण आहे त्यांत हा धर्म प्रथम श्वेतद्वीपांत भगवानापासूनच..- नारदेन तु संप्राप्तः सरहस्यः ससंग्रहः । एष धर्मों जगन्नाथात् साक्षान्नारायणाप ॥ एवमेप महान्धर्मः स ते पूर्व नृपोत्तम । कथितो हरिगीतासु समासविधिकल्पितः । "नारदास प्राप्त झाला असून, तोच महान् धर्म हे राजा ! तुला पूर्वी हरिगीतेत म्हणजे भगवद्गीतेत समासविधिसहित सांगितला आहे,"- असें वैशंपायन जनमेजयास सांगत असून (म. भा. शां. ३४६.९,१०) पुढे "युद्धांत विमनस्क झालेल्या अर्जुनास हा धर्म सांगितलेला आहे" असें पुनः म्हटले आहे (म. भा. शां ३४०.८). यावरून गीतेतला योग म्हणजे कर्मयोग भागवतधर्मातला आहे हैं उघड होते (गीतार. पृ. ९-११). विस्तारभयास्तव गीतेत त्याची संप्रदाय परंपरा सृष्टीच्या मूळारंभापासून दिली नाहीं; विवस्वान्, मनु, इक्ष्वाकु या तिघांचाच मल्लेख केलेला आहे. पण याचा खरा अर्थ काय हे नारायणीय धर्माची सर्व परंपरा पाहिली म्हणजे स्पष्ट दिसून येते. ब्रह्मदेवाचे एकंदर अन्म सात. त्यांपैकी पहिल्या सहा जन्मांधील नारायणीय धर्माच्या परंपरेंचे