पान:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमद्भगवद्गीता विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् । एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥२॥ स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । अध्याय चवथा. [कर्म कोणाला चुकत नाही म्हणून बुद्धि निष्काम झाली तरी कर्म केलेच पाहिजे; कर्म म्हणजेच यज्ञयागादि कर्म; पण मीमांसकांची ही कर्मे स्वर्गप्रद अतएव एक प्रकार बंधक असल्यामुळे ती आसक्ति सोडून केर्ली पाहिजेत; ज्ञानाने स्वार्थबुद्धि सुटली तरी कर्म सुटत नाही म्हणून ज्ञास्यानेहि निष्कामकर्म केलेच पाहिजे; लोकसंग्रहार्थ ते अवश्य आहे;-इत्यादि प्रकारे कर्मयोगाचे आतापर्यत में विवेचन केले तंच या अध्यायांत दृढ केछ आहे आयुष्यक्रमणाचा हा मार्ग म्हणजे निष्टा अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्या- साठी नवी सांगितली अशी शंका येऊ नये, म्हणून या मागोची प्राचीन गुरुपरंपरा प्रथम सांगतात-1 श्रीभगवान् म्हणाल-(1) अव्यय म्हणजे कधीहि क्षीण न होणारा किंवा त्रिकालाबाधित व निस्य असा हा (कर्म)योग (मार्ग) मी विवस्वानाला म्ह० सूर्याला सांगितला, विवस्वानाने (आपला पुत्र) मनु यास सांगितला, आणि मनूने (आपला पुत्र इक्ष्वाकु यास सांगितला. (२) अशा परंपरेनें प्राप्त झालेला हा (योग) राजपीना माहीत झाला. पण दीर्घकालाने तोच योग हे शत्रुतापना (अर्जुना) या लोकी नष्ट झाला. (१) तोच हा पुरातन योग (कर्मयोगमार्ग), है (सर्व रहस्यांतील) उत्तम रहस्य म्हणून 'मी आज तुला' तूं माझा भक्त आणि ससा आहेस थासाठी, सांगितला.