पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी (२२१ ) फिर्यादी तर्फे पुरावा आटपल्यानंतर महाराजांच्या तर्फे सारजंट बालंटाईन यांनी कांहीं पुरावा दिला नाहीं. फिर्यादीकडून जो पुरावा झाला तोच अगदीं अविश्वास- नीय आणि विसंगत आहे, व त्याजवरून महाराजांवर दोष लागू करूं शकवणार नाही अशी त्यांची खातरजमा होऊन त्यांनी तारीख १३ मार्च रोजी आपलें भा. षण सुरू केलें. ते ऐकण्याकरिता कोर्टात पराकाष्ठेची गर्दी झाली होती. आणि कपिलाषष्ठीच्या पर्वणीला भाविक लोक जसे एखाद्या महातिर्थी स्नान करण्यास ए- कलं होतात त्याप्रमाणे लांबवरचे मोठमोठें लोक भाषण ऐकण्याला जमले होते. सारजंट बालंटाईन यांनी आपले भाषण सुरू करण्यापूर्वी कमिशनास अशी वि- नंती केली कीं, श्रीमन्मल्हारराव महाराज मला अशी फर्मास करतात कीं, त्यांची कैफियत कोर्टापुढे वाचून दाखवावी; आणि याप्रमाणे ब्रानसन साहेब यांनी कोर्टा- च्या परवानगीनें महाराजांची कैफियत वाचून दाखविली ती येणेप्रमाणे :- - माझे दरबारांतील रेसिडेंट कर्नल फेर साहेब यांस विषप्रयोग करण्याच्या प्रयत्नांत माझे आंग आहे असा माझे परम मित्र नेक नामदार गवरनर जनरल साहेब बाहदूर यांचे मनांत संशय उत्पन्न केल्यावरून त्या दुष्टसंशयापासून मी माझा उजळामाथा- करून घेण्याची मला संधी देण्याविषयीं त्यांनी आपली इच्छा प्रदर्शीत केल्यावरून त्यांच्या व आलमदुनियेच्या नजरेनें मी निर्दोष आहे असे दाखविण्यास्तव खाली लिहि- लेली हकीगत सादर करित आहे:- कर्नल फेर साहेब यांजशी माझे खाजगत वैर कधींही नव्हतें व आतांही नाहीं. कर्नल फेर रेसिडेंट झाल्यापासून त्यांनी जो मार्ग स्विकारला होता, त्यामुळे सन १८७३च्या कमिशनच्या रिपोर्टावरून नामदार गवरनर जनरल यांनी ता० २५ जुलई सन १८७३ च्या खलित्यांत जी सला दिली होती त्याप्रमाणें राज्यकारभारांत मनस्तोषकर सुधार- णुक करणे आशक्य झालें होतें अशी माझी व माझ्या प्रधानमंडळींची खातरजमा झा ली होती, ही गोष्ट खरी आहे. त्याबद्दल माझे प्रधान दादाभाई नवरोजी, बाळा मंगेश वागळे, होरमदजी अरदेसर वाडिया, काजी शाहाबुदीन आणि दुसरे यांजवरोबर मी पुष्कळ वेळपर्यंत पोक्त विचार करून ता० २ नवंचर सन १८७४चा खलिता कर्नल फेर यांचे मार्फत नेक नामदार व्हाइसराय साहेब यांनकडे रवाना केला. या कामांत कर्नल फेर आडवे आले परंतु माझी अशी खातरजमा झाली होती की खरी हकीगत नामदार व्हाइस- रायसाहेब यांचे कानावर गेली असतां माझें ह्मणणे त्यांस मान्य होईल. मुंबई सरका- रांनी कर्नल फेर यांस सक्त ठपका दिला होता याची आह्मांस माहिती होती हैं ए- क आमच्या खातरजमेस बलवत्तर प्रमाण होतें; आणि कर्नल फेर यांस तारीख २५ नवंबर सन १८७४ रोज माझे दरबारांतून काढिले यावरून आमच्या समजुतीत कांही चूक नव्हती हें स्पष्ट झाले आहे. यावरून ज्या बद्दल मजवर आरोप आणिला आहे ते पातक करण्याविषयी प्रयत्न करण्याचा खासगत किंवा राजकीय संबंधानें. काहीं एक हेतु नव्हता असे सिद्ध होते; आणि मी प्रतिज्ञापूर्वक सांगतों कीं, मी स्वतः किंवा कोणाचे मार्फत कधीही कर्नल फेर यांचा नाश करावा या हेतूने को-