पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०४ ) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. मल्हारराव महाराज यांजवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमलेलें हैं क मिशन अपूर्व होय. या कमिशनापुढे ज्यांची चौकशी व्हावयाची होती, ते एक मोठ्या प्रतापशाली राजकुलांतील असून गुजराथे सारख्या धनसंपन्न देशांतील पंचवीस लक्ष प्रजेचे स्वामी होते. त्याप्रमाणेच या कमिशनांत नेमलेले अधिकारी फारच मोठ्या योग्यतेचे होते. सर रिचर्ड काउच यांस केवळ न्यायाची मूर्ति ह्मटलें तरी शोभण्यासारखें आहे. हिंदुस्थानांत त्यावेळेस न्यायखात्यामध्ये इतक्या योग्यतेस चढलेला दुसरा कोणी पुरुष नव्हता. सर रिचर्ड मीड आणि मेल व्हिल हेही मांड्या योग्यतेचे असून विद्वान होते. या कमिशनांत जे दोन राजे होते, ते हा तसेच मोठया पदवीचे आणि लोकविश्रुत कुळांचे वंशज होते. श्रीमंत महाराजा अलिजा बहादूर यांच्या पूर्वजांच्या चरित्राकडे लक्ष गेळे झणजे आनंदानें नेत्र भरून जातात. मुसलमानांचा पराजय करण्याकरितां मराठवांनीं समशेर हातांत घरल्या नंतर त्या कुळांत मोठे मोठे जे प्रतापशाली पुरुष होऊन गेले, त्यांत शिंद्यांच्या कुळांतील पुरुष फारच पराक्रमी होते. महादजी शिंदे यांस हिंदु- स्थानचा नेपोलियन बोनापार्ट असे झटले तरी चालेल. यांच्या कारकीर्दीत या घराण्याच्या ऐश्वर्याची, शौर्याची, आणि कीर्तीची कमाल झाली होती. महादजी बोबा आपल्यास पेशव्यांचे सेवक ह्मणवून घेत होते, पण खरोखर ते दिल्लीचा बा- दशहा शहा आलम याचे स्वामी होते. साल्पीच्या तहानें शिंदे यांस जरी स्वतंत्र राजे मानले होते, तरी ते पेशव्यांचा आणि आपला सेव्यसेवकसंबंध विसरले नाहींत. जेव्हां महादजी बोवा यांचा शहा आलम यांजवर पगडा बसला, तेव्हा त्यांनी पेशव्यांच्या नांवें वकील मुतालिकची स नद सही करून घेऊन, आपण पेशव्यांचे मुतालिक झाले. परंतु श्रीमंत सवाई मा- धवराव साहब यांस मुजरा करण्याकरितां व सन्मान देण्याकरितां ते पुण्यास आले, तेव्हां ग्रांनीं निरहंकारता आणि स्वामीभक्ति दाखविली, ती फारच गमतीची आणि मनोवेधक आहे. ज्यांजकडे सतलज नदी पासून आग्रया पर्यंतच्या हिंदुस्थान देशांचे प्रभुत्व होतें, ज्यांनी रजपुतान्यांतील पराक्रमी राजे जिंकून करद करून सो डले होते, कवायत शिकवलेल्या साठ पलटणी, पांचशें तोफा, आणि एक लक्ष अश्वसेना, इतक्या प्रचंड सेनेचें ज्यांजकडेस स्वामित्व होतें, माळव्याचा दो. त तृतियांश मुलूख, आणि त्या रेवरीज दक्षिणेतील अत्युत्तम परगणे यांच्यावर ज्यांचें स्वामित्व होते, असा हा प्रतापशाली पुरुष पुण्यास आला तेव्हां पुण्याच्या दरवाज्या जवळ हत्तीवरून खाली उतरून पायाने चालत दरबारांत आला, आणि दरबारांत मोठे मोठे वंशपरंपरेचे सरदार होते त्यांच्या शेवटी उभा राहिला. जेव्हां पेशवे साहेब यांची स्वारी दरबारांत आली, तेव्हां त्यांनी दुसऱ्या सरदा- रांच्या मिसळीत बसण्याविषयीं महादजी बोवा यांस सांगितलें. तेव्हा त्यांनी सांगितलें कीं, धन्याच्या समोर मी दरबारांत १ बस प्यास योग्य नाहीं; आणि आपल्या कार्खेत जो जोडा होता तो पेशव्यांच्या च