पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. ( २०३ ) मोठ्या पदवीचे आहेत, व पुढे असाच कधी प्रसंग आला असतां हो रीत कायमची व्हावी, यांजकरितां ह्या चौकशीच्या बाबतीत जितका पक्का बंदोबस्त होईल तितका चांगला व अवश्य आहे. यास्तव या कमिशनांत युरोपियन आणि देशी गृहस्थ यांची संख्या समान असावी. आणि युरोपियन आणि देशी सभासद यांनी त्या कमिशनच्या अध्यक्षांस, आपण न्याय सभेचे पंच (जुरर) आहोत अशा नात्याने मदत करावी. देशी गृहस्थांची जी नेमणूक करावयाची ती कलकत्ता व मुंबई हायको- टाँत जे नेटीव जज्ज आहेत, त्यांतून करावी, अगर मराठे अथवा मुसलमान राजां- पैकी पहिल्या प्रतीच्या राजांची नेमणूक करावी. अशा प्रकारच्या मिश्र न्याय- सभेपुढे चौकशी झाल्यानें त्या हतभाग्य राजांस असें वाटेल की, आपल्या बरोबरी च्या लोकांनी आपली चौकशी केली आहे. आणि लोकांचीही अशी खातर- जमा होईल की, इंग्रजसरकारच्या मनांत या कामांत कांहीं एक लटपट होऊ द्याव- याची नाहीं, अणि खरा न्याय महाराजांस मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. सदरी लिहिलेल्या अर्जा षयीं हिंदुस्थान सरकारांनी योग्य विचार करून या कमिशनांत तीन युरोपियन सभासदांबरोबर मोठ्या पदवीचे तीन देशी गृहस्थ ने मावेत असा ठराव केला. if राजांपैकी इंग्रजसरकारच्या चाकरींतील मोठ्या हुद्यांचे, हिंदुस्थानांतील देशी मोठ्या पदवीचे, आणि देशी राजांच्या दरबारचा कारभार करून योग्यतेस आलेल्या लोकांपैकी मेट्या योग्यतेचे ह्या कमिशनांत जे सभासद होते ते:- १ सर रिचर्ड काऊच, नाइट ब्याचलर आणि बंगाल इलाख्याच्या हायकोटींचे चीफ जज्ज. २ श्रीमंत महाराजा मुख्तारुल् मुलुख्, अजी मुल् इख्तिदार, रफी उश्शान, वा.. लाशको, मोतसे मुद्दचरान्, उमदतलउमरा, महाराजाधिराज, अलीजा महारा- जा जयाजीराव शिंदे बहादूर, श्रीनाथ, मनसुरे जमाने, फिदवीये हजरत मलिकामाझमा, रफीउद्दरज्जे इंग्लिस्तान, महाराजा ऑफ् ग्वालियर, नाईट ग्र्याड् कमांडर् ऑफू घी मोस्ट एक्झाल्ट्रेड आरडर• ऑफू घी स्टार ऑफ़ इंडिया. ३ श्रीमंत महाराज सरामदे राजाये हिंदुस्थान, राजराजेंद्र श्री महाराजाधिराज सवाई रामसिंग बहादूर, महाराज: ऑफू जयपूर, नाईट् ग्रथांडू कमांडर् ऑफ. घी मोस्ट् एक्झाल्टेड् आरडर ऑफ घी स्टार ऑफ इंडिया. ४ कर्नल सर रिचर्ड मीड नाईट कम्यांडर ऑफ दी मोस्ट एकझाल्टेड ऑफ ५ दी स्टार ऑफ इंडिया, आणि लैसूर आणि कुरग यांचे चीफ कमिशनर.. राव राजे सर दिनकरराव नाइट कम्पांडर ऑफ धी मोस्ट एक्सालटेड आर्डर ऑफ धी स्टार ऑफ इंडिया. ६ फिलिप स्यांडिस मेळव्हिल पंजाबचे कमिशनर.