पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांस विषप्रयोग केल्याबद्दलची चौकशी. ( २०१ ) निर्बळ राजाबरोबर कशी वर्तणूक ठेवावी याविषयों फारच सुंदर लेख लिहिला आहे. त्यांतील तात्पर्य असे आहे की, ज्यांच्या हातांत राज्यसत्ता आहे, त्यांस फार दया असणे हे एक भूषण आहे. ब्रिटिश सरकारच्या हिंदुस्थानांतील राज्याचा पाया बेळकट झालेला आहे, सचत्र त्यांनी देशी राजाबरोबर दयेनें वागणे हाच त्यांचा एक मोठा हक्क आहे. ब्रिटिश सरकार आणि देशी राजे यांचा शक्ति आणि सुशिक्षिता. वस्था यांजमध्ये इतकी तफावत आहे कीं, देशी राजांपासून ज्या गोष्टींची. ब्रिटिश सरकार अपेक्षा करितात, त्या गोष्टी जर जालीम उपायाने अमळांत आणण्याविषयीं इच्छा करतील तर देशी राजांचा टिकाव लागणार नाहीं यास्तव ब्रिटिश सरकारानीं देशी राजांच्या बरोबरच्या वागणुकीत, त्यांच्या अंगी असणाऱ्या न्यूनतेकडे, दयेनें, व सहनशीलतेनेच पाहिले पाहिजे. आणि विशेष करून बडोद्याच्या राजांशी तर त्या रीतीने वागणे फार अवश्य आहे. कारण कीं, पश्चिम हिंदुस्थानांत ब्रिटिश सरका रचें राज्य स्थापन झाल्यापासून, ह्मणजे आज सुमारे शंभर वर्षे होत आलीं, गाय- कबाड़ सरकारची इंग्रज सरकाराबरोबर अखंड दोस्ती आहे. महाराज मल्हारराव यांवर आणलेल्या तोहमतीच्या विरुद्ध महाराज बोलले ते- व्हां त्यांनी ह्या गोष्टींचा उल्लेख केला व ते स्पष्ट बोलले की, रेसिडेंटास विष घाल ण्याचे कामांत सामील होऊन गोविंदराव गायकवाडाचे कुळास बट्टा लावण्याचें काम त्यांच्या वंशजाकडून होणार नाहीं; हे राजाचे मुखांतून निघालेले शब्द लक्ष देण्यास योग्य आहेत. महाराज मल्हारराव यांस पुष्कळ दुस्मान असून ते पाहिजे त्या रीतीनें कुभांड रचण्यास मार्गेपुढे पहाणारे नाहींत. शिवाय महाराजांवर आणलेल्या तोहमती संबंधीं घडलेल्या गोष्टी उघड अंदेशा घेण्यासारख्या आहेत. तेव्हां त्यांच्या वर गुन्हा शाबीत होईपर्यंत त्यांस निरपराधी मानणे व त्यांच्या स्वतांच्या नुकसानीत निरपराधी प्रजेस घोटाळ्यांत न टाकणें हा मोठा दयेचाच विचार आहे, आणि ना. मदार सरकारांनी प्रसिद्ध केलेल्या जाहोग्नाभ्यांत ह्या कर्तव्याकडे लक्ष दिले, हें पा- हून अबालवृद्ध प्रजेस पूर्ण समाधान झाले आहे. आठवे कलमांत बडोद्याचे राज्य खालसा करण्यांत येणार नाहीं, याबद्दल जी जाहिरनाम्यांत अभिवचनें दिलीं, व सर लुईस पेली यांनी दरबार भरवून त्यांत त्यां अर्थाचें भाषण केले त्याबद्दल लॉर्ड नार्थब्रुक यांचे उपकार मानिले आहेत. आण- खी त्यांत असे लिहिले आहे कीं, हजारों लढाया करून जय मिळविल्याने इंग्रज सरकारच्या राज्यास जितकी बळकटी येणार नाहीं, तितकी देशी राज्यें खालसांत duty in the proclamation issued by your Excellency's Government has filled all classes of your snbjects with unmixed satisfaction, 8. Lastly the determination not to annex Baroda is consonant with the highest policy. Her Most Gacious Majesty's word has been pledged in her proclamation to maintain the integrity of native States which have proved in troubled times to be the best supports of British power in this country. Above all, the moral influence of this act of sovereign interference in the way of meting out retributive justice to a guilty