पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जुन्या राज्यपद्धतीचें वर्णन व त्यांत पुढें फेरबदल. (२५) बाहींत थोडेसे जोंवळे घालावे, आणि शेतकरी लोक जेथें आगटी करून शेकत बसतात, त्या आगटीच्या राखेंत मोठी हातचलाखी करून, ज्या धान्याचें तें शेत असेल त्या धान्याचे कांहीं कण त्यांत सांडावे, आणि त्या शेतकऱ्यानें कणसे तोडून हुरडा अथवा लिंबूर खालला, असा त्याजवर दोष आणून त्याबद्दल त्याजपासून कांहीं तरी ज्यास्त माल घ्यावा. त्या वेळेस ऐन मालांतून सरकारचा भाग घेत असत, यामुळे सरकारचा भाग दिल्यावांचून शेतांतील एक कणीस तोडण्याचा देखील शेतकरी यास हक्क नव्हता. प्रांताचे व महालचे इस्तावेदार किती स्वतंत्रपणे मुलखाचा कारभार चालवीत होते, त्याचे प्रमाण वतनदार लोकांजवळ राजांच्या सहीशिक्यानिशी ताकीदपत्रे आहेत त्यावरून चांगले समजतें. देसाई, मुजमदार वगैरे मोठे मोठे वतनदार यांचीं वतने इस्तावेदार याणीं बेलाशक जप्त करावी, आणि मग त्या वतनदारांनी बडोद्यास येऊन दरबारचे साधन करून, वतनाच्या खुलाशाबद्दल ताकीदपत्रे मिळवावीं, तो कमावीसदार यांणी न मानली म्हणजे दुसरी मिळवावी. याप्रमाणे प्रत्येक वतनदाराजवळ ताकीदपत्रांचा मोठा भरणा आहे; आणि त्याचे कारण प्रांताचे सुभे आणि महालचे कमावीसदार यांचा अमर्याद स्वतंत्रपणा होय. गोपाळराव मैराळ यांचा वदान्यपणा तर इतका मर्यादा सोडून गेला होता की, नवसरी प्रांत त्यांजकडे इस्ताव्यानें होता त्या वेळेस त्याणी ब्राम्हण लोकांस वर्षासनाबद्दल आपल्या सही शिक्यानिशीं वंशपरंपरेच्या सनदा करून दिल्या होत्या, आणि त्या धर्म कृत्य म्हणून त्या वेळच्या राजांनी मान्य केल्या होत्या. ही त्या वेळची मुलखाची स्थिति झाली. बडोदे राजधानीत तर त्यापेक्षां देखील लोकांवर ज्यास्त जुलूम होत होता असे मानले तरी चालेल. शहराचे निरनिराळे भाग करून त्यास चउत्रे अशी नांवें दिली होती. आज देखील ती नांवे कायम आहेत. शहर चउत्रा, वाडी चउत्रा, फतेपूर चउत्रा, आणि रावपुरा चउत्रा, इत्यादि. या चउत्र्यांच्या हर्दीतील हलक्या गुन्ह्याबद्दल जे कांहीं दंडफुरोईबद्दल उत्पन्न व्हावयाचे त्याबद्दल जो कोणी ज्यास्त रुपये देईल त्यास इजारा देत होते. त्या इजारदारास कोतवाल म्हणत असत. अनाश्रित लोकांस या कोतवालांकडून फार उपद्रव होत होता. कोणी अंमळ सधन दिसला, आणि त्याचा कोणी दरबारांत कैवारी नसला की, त्याजवर कोतवालाने धाड घातलीच. तूं अमुक स्त्रीशी व्यभिचार केला आहेस असें कोतवालाने म्हटले की, त्या बिचाया गुजराथ्याचे गेले हातपाय गळून. मी व्यभिचार केला नाही म्हणून म्हणतां उपयोग नाहीं, केला म्हणून म्हणतां उपयोग नाहीं. नाही म्हटले तर कोतवाल दोन साक्षी उभे करून लोकांत बभ्रा करणार, आणि ती गोष्ट बाहेर आली म्हणजे ज्ञातीच्या दंडाचें व वेअब्रूचें भय, होय म्हटले तर कोतवाल मागेल तो दंड दिला पाहिजे. अशा त्याच्या घोटाळ्याच्या स्थितीत चउत्र्या- वरील दरोगे भगुभाई याने घ्यावा त्या गुजराथ्याचा पक्ष, आणि कानोग्याने घ्यावा कोतवालाचा पक्ष, आणि तोडजोडीवर गोष्ट आणून त्याजपासून अंकाची जागा रिकामी ठेवून त्याच्या

  • सहीची एक चिट्ठी लिहून घ्यावी. त्यांत ' मी अमुक स्त्रीबरोबर चाम चोरी केली

त्याबद्दल अमुक रुपये दंड देईन' अशी स्पष्ट कबुलात लिहून घेऊन मग त्या कबुलातींत ४.