पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६४) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास स्पष्ट होतें कीं, ज्या लोकांवर विषप्रयोग केल्याचा संशय आहे, त्या लोकांस कोणी तरी मोठ्या मनुष्यानें ह्या किंमती वस्तूंचा पुरवठा केला अ.हे. तिसरें. माझा प्राण हरण करण्याचा हा प्रयत्न मल्हारराव महाराज यांच्या जाण- पणांत आणि डोळेझांकीने झाला असून, ज्या मनुष्यांवर संशय उत्पन्न झाला आहे. त्या रेसिडेंन्सीच्या चाकरांबरोबर काही महिन्यापासन मल्हारराव महाराज यांचे दोन विश्वास चाकर संगनमत करीत आले आहेत. चौथें. खानगी द्वेष कांहीं या कृत्यांचा उद्देश नव्हे. पांचवें. दरबारचे पोलिस आणि न्यायाची व्यवस्था यांचा मला अनुभव आहे त्यावरून मला असा भरवंसा नाहीं, कीं, मल्हारराव महाराज यांच्या हातांत राज्यस त्ता राहील, तोपर्यंत या पातकाचा मुख्य प्रेरक शोधून काढू शकवेल. हह्रीं जे लो- क कैदेत आहेत, त्या खेरीज या कामांत सामील असल्याबद्दल तीन मनुष्यांवर मला फार संशय आहे ते है:- १ यशवंतराव येवल्या २ माधवराव काळ्या ३ अरबस्वार सालम. या तिघांपैकी पहिला दोन किंवा तीन दिवस झाले, अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाचे निमित्ताने गेला आहे. दुसरा परवांचे दिवशीं एकाएकी वारला; तो विरुद्ध पक्षांस मिळेल असे भासल्यावरून, त्यास विष देऊन मारल्या विषयीं, भुमका आहे. आणि तिसरा, मक्केच्या यात्रेस जाण्याच्या विचारांत आहे अशी लोकवार्ता आहे; पण त्या वार्तेस अन्य प्रमाणांची अपेक्षा आहे. याप्रमाणें मी मुख्य सिद्धांत ठरवून चुकलों आहे. आतां माझें इतकेच कर्तव्य उ रले आहे कीं, सन १८५७च्या सालापासून ह्या वेळपर्यंत मल्हारराव महाराज यांनीं जें वर्तन केले, त्याबद्दल रेसिडेंन्सीच्या दप्तरांत जो अतिशय महत्वाचा पुरावा आहे, त्या विषयींची संक्षिप्त हकीगत सांगून त्यावरून मी ज्या सिद्धांताला येऊन ठेपलों आहे, तो सिद्धांत सिद्ध करून दाखवावा ह्मणजे त्यावरून मल्हारराव महाराज यां- च्या कारकीर्दीत आणि त्यापूर्वी कोण कोणत्या अद्भुत गोष्टीं घडून आल्या आहेत, त्या उजेडांत येतील, आणि त्याच वेळेस असें ही दृष्टोत्पत्तीस येईल कीं, हा हिं- दुस्थानांतील राजा, विचारपूर्वक, कावेबाजी, दूरवर अवलोकन, आणि गुप्तपणा, यां- च्या योगानें कोणत्या रीतीनें आपल्या मसलती सिद्धीस नेत आहे; आणि आपल्या कृपेंतील लोक, आणि मारेकरी यांच्या साधनांनी आपले नीच विचार कसे साधीत आहे, आणि आजपर्यंत त्याबद्दलच्या शासनाला कसा चुकवीत आहे. आतां मात्र तो बचावून जाणार नाही अशी आशा आहे. , सन १८५७चे सालांत जेव्हा हा राजा पंचवीस किंवा सव्वीस वर्षांचा होता, तेव्हां त्यानें पातक करण्यास आरंभ केला. मी तारीख ९ फेब्रुवारी सन १८७४ रोजीं सरकारांस रिपोर्ट केला आहे त्यांत असे दाखविलें कीं सन १८५७च्या आ क्टोबर महिन्यांत गुजराथेची स्वस्थता भंग करण्याकरितां, बंड करण्याविषयीं कार- स्थान रचलें होतें.