पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्नल फेर यांच्या गैरवर्तनाचा योग्य परिणाम. (१११) चा, व बडोदे सरकार जे प्रयत्न करतील त्यांचे उत्पादक आपण आहोत असे दा- खविण्याचा प्रयत्न न करितां त्यांच्या प्रयत्नास यश येईल अशा रीतीची फार जपून वागणूक करावी. त्याच कलमाचे शेवटीं आणखी अशी सूचना केली आहे कीं, रेसिडेंट यांनीं सला देतांना महाराजांच्या योग्यतेकडेस आणि अधिकाराकडेस पूर्ण लक्ष द्यावें आणि त्यांजबरोबर अशा रीतीने दळणवळण ठेवावे की, त्यापासून महाराजांस किंचित् देखील वाईट बाटूं नये व त्यांच्या अधिकारास तिळमात देखील उणेपणा येऊं नये. ह्या गवरनर जनरलच्या सूचना कर्नल फेर यांनी अगदीं तुच्छ मानिल्या. फार तर काय सांगावें, महाराजांचे राज्यसुधारणुकीसंबंधी प्रयत्न निष्कळ करण्यांत, त्यांची योग्यता व अधिकार कमी करण्यांत आणि त्यांच्या प्रजेपुढे त्यांचा पाणउ तारा करण्यांत जितकें कर्नल फेर यांजमध्ये सामर्थ्य होतें तितकें त्यांनीं खर्च केले होते असे ह्मणतांना तिलमाय शंका वाटत नाहीं. 'दादाभाईच्या दिवाणगिरीत महाराज जें कांहीं करूं पाहत आहेत यासच जर सु- धारणूक ह्मणत असतील तर त्याचा शेवट एकच होईल आणि तोही थोड्या अव काशांत' हा रोसडेंट यांची महाराजांस सला देण्याची पद्धत आणि सभ्य रीत आणि गवरनर जनरल यांच्या उपदेशाचा त्यांच्या अंतःकरणावर उमटलेला ठसा, आणि त्यांस बडोद्याच्या रोसदेन्सीच्या हुद्यावर राहू देणें हो मुंबई सरकारची उत्तम राजनिती, आणि महाराजांजवळील जुन्या लोकांस गवरनर जनरल यांनी बडो- द्यांस राहू दिलें हा मात्र त्यांचा अति अविचार. कमिशनच्या रिपोर्टावर गवरनर जनरल यांनी ठराव केले ते अमलांत आणण्या- विषयीं मुंबई सरकारांनी कर्नल फेर यांस हुकूम दिले. त्यांत गायकवाडाचे जवळचे आप्तवर्गांपैकी फक्त रखमाबाईच्या बंदोबस्ताविषयीं मात्र गायकवाडाबरोबर बोलाचाल करावी, त्याखेरीज दुसऱ्याविषयों मुंबई सरकारचा पूर्वी हुकूम घेतल्यावांचून तुह्मीं गायकवाड यांजबरोबर अगदी पत्रव्यवहार करूं नये असा त्यांस हुकूम दिला * अ- सतां त्यांनी दरबारांत तारीख १७ आगष्ट सन १८७४ नंबर १५३३ ची यादी | “ In conveying his advice the Resident will be careful to study the honour and “ dignity of the Maharaja, and make his communication in the manner least distast- “ ful to His Highness, and least calculated to weaken his authority.” (Blue book No. 1 Page 353.)

  • “ This requisition should be made immediate in the case of Rukhmabaee.

No communication should be made to the Gaekwar or to the Durbar about any other lady, without previous consultation with Government." (Blue Book No. 4 Page 40.) † “ The next subject upon which I am instructed to invite the serious atten tion of Your Highness with & view to settlement, according to equity and reason, and further authoritative advice being ultimately offered regarding it, should such be recessary, is that Your Highness should make suitable provision for all the imme-