पान:श्रीमंत महाराज मल्हारराव गायकवाड ह्यांचा खरा इतिहास.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ११०) मल्हारराव महाराज गायकवाड यांचा खरा इतिहास. ६ गवरनर जनरल यांनीं जी मुदत दिली आहे त्या काळामध्यें कांहीं दरम्यान गिरी करूं शकवणार नाहीं. ७ आपण सळा देऊं शकूं, व त्या नाकारल्याची नोंद ठेवूं शकूं; परंतु ती मोज- दाद मुदतीचा शेवट होईपर्यंत दफ्तरांत बांधून ठेवावयाची आहे. जे लोक गायकवाडांनी मागितले आहेत त्यांनी मोठी प्रतिष्ठा मिळविली आ हे, आणि त्यांचा त्यांच्या सरकारावर मोठा हक्क आहे. बडोद्याचा मागील इ तिहास आणि प्रामाणीकपणानें चाकरी करीत असतांना त्यांस ज्यांजबरोबर भांडावें लागेल त्यांची शक्ति त्यांस माहीत आहे. ८ ९ आणि हे खचित आहे कीं, मुदतीमध्ये जर काहीच सुधारणा करण्यांत आ ली नाहीं तर त्याबद्दल जितका दोष आणवेल तितका त्या लोकांवर आण ण्याचा प्रयत्न करण्यांत येईल; या कारणामुळे आपल्या सरकारच्या दृष्टीने आपली किंमत कमी होईल असे त्या लोकांनीं भय बाळगावें हें स्वाभावि- क आहे. याप्रमाणे मल्हारराव महाराज यांच्या भावी स्थितीविषयीं मुंबई सरकारांनी नि- श्वय करून टाकला होता. महाराजांजवळील बदसलागार लोकांमध्ये शिरोमणी जो खानवेलकर, व्यास प्र तिनिधी नेमिलें असतां आपली कांहीं हरकत नाही असे महाराजांस कळवून त्यास प्रतिनिधी नेमण्याविषयीं उत्तेजन मुंबई सरकार यांनीच दिले. इंग्रजसरकारच्या अधिकाऱ्याचें आगतस्वागत करण्याचा दिवाणाचा अधिकार असतां खानवेलकर यांच्या हातानें आगतस्वागत स्वीकारण्याचे त्यांनींच कबूल केले, आणि तेच अशी सबब सांगू लागले कीं, बदसलागार लोकांचा महाराजांजवळ प्रवेश असल्या- मुळे चांगली सला देणाराचे विचार शेवटास जाणार नाहीत. त्यांचे रेसिडेंट क र्नल फेर मात्र खरोखर मोठे नयज्ञ, सुस्वभावाचे, चांगली सला देणारे, व खरें अ सेल तेंच आपल्या वरिष्ठांस कळविणारे आणि राजाबरोबर अगढ़ीं प्रेमभावानें वा- गणारे आणि आपल्या सरकारच्या हुकमाचा अणुरेणु इतका अतिक्रमन करितां तदनुरूप चालणारे होते !! त्यांस बडोद्याच्या रेसिडेन्सीवर राहूं देण्यांत त्या रा- ष्ट्रास कांहीं देखील अपाय होणार नव्हता. त्यांनी ज्यास बदसलागार ह्मटलें होते त्या लोकांस मात्र अंडमन बेटांत पाठवून दिलें असतें, किंवा तोफेचे तोडीं बांधून उडवून दिले असते, ह्मणजे कर्नल फेरच्या कारकीर्दीत राज्यव्यवस्था उत्त म प्रकारची झालो असती !!! गवरनर जनरल यांनी तारीख २५ जुलई सन १८७४ चें मुंबई सरकारास पत्र लिहिले, त्यांत कर्नल फेर यांनी महाराजांशीं कोणते प्रकारें वर्तन करावें याविषयीं सूचना देण्यांत कांहीं बाकी ठेविली नव्हती. सदरील पत्ताचे आठवे कलमांत व्हा- इसराय यांचे सेक्रेटरी लिहितात कीं, रेसिडेंट यानें स्वतः राज्यकारभार चालविण्या “ He should be careful, however, not to paralyse the efforts of the native " Government by attempting to originate or carry them out himself..”