पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ५ वगैरे पदार्थावर साप, रुपें, मलिनपणा यांचा लोक आरोप करीत असतात; पण, ते पदार्थ स्वतः केवळ दोरी, शिंप, आकाशच असतात. या तऱ्हेनें विरुद्ध धर्म एके ठिकाणी आले (भासले ) तरी पदार्थात विरोध येत नाहीं. नाम, रूप, उपाधि आहेत ह्मटलें, तर, 'एकच द्वितीयरहित आहे,' ' या ठिकाणीं भिन्न भिन्न कांहीं नौहीं, ' या श्रुतींना बाध येईल असें ह्मणाल तर, ( तसा बाध येत ) नाहीं. उदक व फेस ह्या दृष्टांतानें ( उदकाचें एकत्व न ढळतां ) भेद शंका दूर केली आहे. माती ( व तिच्या घडलेल्या वस्तु ) इत्यादि दृष्टांतांनींही ( भेदशंकेचा परिहार केला आहे. ) पण जेव्हां 'एकच द्वितीयरहित आहे. ह्या ठिकाणी भिन्न भिन्न कांहीं नाहीं. " या श्रुतींना अनुसरणाऱ्या लोकांनी परमात्मतत्वाहून भिन्नत्वानें वर्णिलेली नामरूपें, घट, फेस, वगैरे मृत्तिका, उदक वगैरेहून वस्तुतः भिन्न नसतात, त्याप्रमाणें वस्तुदृष्ट्या भिन्न नाहीत, असें घेतले असेल तेव्हां परमात्मतत्वाच्या संबंधानें “एकच अद्वितीय आहे,' ‘येथें भिन्न भिन्न कांहीं नाहीं " वगैरे श्रुति खरें तत्त्व सांगणाऱ्या आहेत असें ठरतें. पण जेव्हां स्वभावसिद्ध अविद्येच्या कारणानें, ब्रह्मस्वरूप मात्र दोरी, शिंप, आकाश या वस्तूंच्या स्वरूपांप्रमाणें खरें असून, कोणत्याही उपाधीचा त्याला स्पर्श होत नाही, असें असतांही नामरूपांनी उप्तन्न केलेल्या, कार्ये ( देह ) व करणें ( इंद्रियें ) ह्या उपाधींपासून (ब्रह्म ) निराळें आहे, असा निश्चय होत नाहीं; व नामरूपात्मक उपाधि (सत्य ) आहे, असें स्वभावतः वाटत असतें; तेव्हां ब्रह्माहून इतर वस्तु आहेत अशी भाषा ( बोलण्याचा प्रघात ) असते. ही भेदबुद्धि- जानत खोटी भाषा ब्रह्मतत्वाहून उपाधि भिन्न आहेत,व भिन्न नाहीत, असें ह्मणणाऱ्या दोघांच्याही बोलण्यांत राहतेच. परंतु खरा अर्थ सांगणारे लोक श्रुतीला अनुसरून वस्तुविचार करूं लागले ह्मणजे सत्वतः खरें काय आहे, व खरें नाहीं काय ? ( असा विचार करतानां ) ब्रह्म एकच द्वितीयरहित असून सर्व व्यवहाररहित आहे, असा निश्चय करितात; त्यामुळे कोणताच विरोध नाहीं. कारण अत्यंत खऱ्या अर्थाविषयी निश्चय होऊन निष्ठा बसली ह्मणजे ( ब्रह्माहून ) अन्य वस्तु नाहीं; & 2 असें ' एकच द्वितीयरहित, ' ' आंत नाहीं बाहेर नांहीं, ' ह्या श्रुती वरून समजूत करून घेतों. नामरूपाचा व्यवहार चालवीत असतांना अविवेकी लोकांमध्ये क्रिया, क्रियासाधनें, व त्यांची फलें वगैरे व्यवहार (भेदव्यवहार ) नाहीं, असें आह्मीं ह्मणत नाही. एकंदरीत ज्ञान व अज्ञान यांच्या दृष्टीनें शास्त्रीय व लौकिक व्यवहार होत असतो; ह्मणून ( प्रत्यक्ष गोष्टींत व शास्त्रीय गोष्टींत ) विरोधाची शंका नाहीं. वाद करणारे सर्व ज्ञानी लोकांना पारमार्थिक ( मोक्षावस्थेत भेद नाहीं ) असा व्यवहार, व ( संसारदर्शत ) भेदव्यवहार टाळतां येत नाहीं. त्यामध्यें (ह्मणजे कल्पित व पारमार्थिक आत्म्यांमध्यें ) पारमार्थिक आत्म्यास अनुलक्षून पुन्हा ' याज्ञवल्क्या, कोणता सर्वांतर' असा (कहोलाचा ) प्रश्न आहे. दुसरा ( याज्ञवल्क्य ) २ –' नेह नानाऽस्ति किंचन' बृ. ४-४-१९; १–' एकमेवाद्वितीयं छां. ६-२-१. कठ ४, ११. ३ –' अनन्तरमबाह्यम्' बृ. २-५-१९; ३-८-८..