पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १] सर्वोतरज्ञानानें एषणात्याग. ओ सर्वान्तर आत्मा आहे तो मला सांग ? जो जाणला असर्ता (जीव) बंधमुक्त होईल तो सांग. याज्ञवल्क्य उत्तर देतो, 'तो हा तुझा आत्मा. , (आतां ) उपस्तऋषीनें व कहोलऋषीनें एकच आत्मा विचारला, किंवा समान लक्षणाचे भिन्न भिन्न आत्मे विचारले ? भिन्न भिन्न आत्मे विचारले, असें ह्मणणे योग्य आहे; कांतर, दोन्हीं प्रश्नांत पुनरुक्ति दोषाचा अभाव असला पाहिजे. जर उपस्त व कहोल ह्यांच्या प्रश्नांत एका आ- म्याविषयी बोलावयाचें आहे, असें धरलें तर, एकाच प्रश्नानें ज्ञान होत असल्यामुळे त्याविषयीं दुसरा प्रश्न व्यर्थ होणार. (दुसरा प्रश्न) अर्थवादरूप वाक्य आहे असेंही ह्मणतां येत नाहीं. तस्मात् हे आत्मे भिन्न भिन्न आहेत, व एक क्षेत्रज्ञ ( जीव ) व दुसरा परमात्मा (ईश्वर) असावा अशी कोणी व्याख्या करितात. (पण) तसें नाहीं. कारण, 'तुझा' असें स्पष्टपणें झण्टले आहे, व हा तुझा आत्मा असेंच उत्तर वाक्यांत स्पष्ट ह्मण्टले आहे. एका कार्यकारणसमुदायाला (देहाला ) दोन आत्मे आहेत, असें म्ह- णतां येत नाहीं. एक कार्यकारणसमुदाय एका आत्म्यानें आत्मयुक्त होतो. उपस्ताच्या आत्म्याची व कहोलाच्या आत्म्याची जात निराळी नाही. ती (एकसमयावच्छेदानें ) मुख्य आत्मपणायुक्त व सर्वान्तरपणायुक्त होणार नाहीत. जर दोहोंपैकी एक अगौण (मुख्य) ब्रह्म घेतला, तर दुसरा अवश्यमेव गौण असला पाहिजे. असेंच आत्मत्व व सर्वान्तरत्व ( दोन ठिकाणी ) असणार नाहीं, ( एकाला आत्मपणा असला तर दुसरा अनात्मा होईल). (भिन्न) पदार्थ विरुद्ध (स्वभावाचे) अस- तात. जर एक सर्वान्तर ब्रह्मरूप, मुख्य, आत्मा धरिला, तर दुसरा अवश्यमेव सर्वान्तर नव्हे, आत्मा नव्हे, व मुख्य नव्हे. ह्मणून एकच आत्मा श्रुतीनें दोन वेळ ( त्यांतील कांहीं ) कांही विशेष (लक्षणे ) दाखविण्याकरितां सांगितला आहे. पण दुसऱ्या प्रश्नांत पूर्वी सांगितलेला जो भाग समान आहे, तो मात्र पूर्वीच्याचाच अनु- वाद असून, त्याचाच कांहीं न सांगितलेला विशेष सांगावयाचा आहे, असें (घ्यावें.) तो विशेष कोणता ह्मणाल तर सांगतों. पूर्वीच्या प्रश्नांत ज्या आत्म्याला कारणसहित बंध सांगितलेला आहे, तो आत्मा (देहाहून) भिन्न आहे, असें आहे; आणि दुसऱ्या प्रश्नांत त्याच आत्म्याचा भक, तहान, वगैरे संसार धर्मापासून दूर असणे, हें विशेष लक्षण सांगितलें आहे;वती विशेष गोष्ट पूर्णपणें जाणून संन्यास केला असतां, पूर्वी सांगितलेल्या बंधनांतून ( मनुष्य ) मुक्त होतो. याकरितां दोन्हीं प्रश्न व उत्तरें ह्यामध्यें, हा तुझा आत्मा, या शब्दांपर्यंत सारखेपणाच आहे. एकाच आत्म्याला भूक वगैरे नसणें, व असणें, असे विरुद्ध धर्म कसे लागूं होतील? या शंकेचा परिहार केला असल्यामुळे ( तशी शंका येत ) नाहीं. नामरूपांचा विकार जो कार्य- कारणसमुदाय ('देह ) तीच भिन्न उपाधि. तिच्या संपर्कापासून ( मी खाणारा वगैरे ) भ्रान्ति उत्पन्न होते. हाच संसारीपणा, असें आह्मी वारंवार सांगितले आहे. आणि एकास एक विरुद्ध असणाऱ्या श्रुतींचें व्याख्यान करतांना हीच गोष्ट सांगितली. उदाहरण- दोरी, शिंप, आकाश - १ – मधुब्राह्मणाचे शेवटीं परस्परविरुद्ध भासणाऱ्या श्रुर्तीचे व्याख्यानाचे वेळीं संसारीपणा खोटा आहे असें दाखविलें आहे - ( पहा अ. २ - ब्रा. ५)