पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १-२ ] भुज्युब्राह्मण–पारिक्षित मुक्ति. ( ( उपस्तानें ) असें भाषण केलें, त्यास याज्ञवल्क्य उत्तर देतो. हा तुझा आत्मा तो सर्वा- न्तर ह्मणजे सर्वांच्या अभ्यंतरी आहे. सर्व विशेषणांचा संग्रह व्हावा ह्मणूनच ( प्रश्नामध्यें ) सर्वान्तर हें विशेषण दिले आहे. जें प्रत्यक्ष ह्मणजे कोणत्याही पडद्यानें झांकलेलें नव्हे, अपरोक्ष ह्मणजे गौण नव्हे, ब्रह्म ह्मणजे अतिविस्तृत, सर्वांचा आत्मा, सर्वांच्या अभ्यन्तरी असणारा, या सर्व गुणांनी युक्त असा हा आत्मा आहे. तो तुझा आत्मा कोणता तर, जो हा तुझा कार्यकारण- समुदाय ( देह ) ज्याच्यायोगें आत्मयुक्त आहे, तोच हा तुझा आत्मा, कार्यकारणसमुदायाचा आत्मा असें लक्षांत ठेवावें. आतां पिण्ड (देह ) एक आहे, त्याच्या अन्तर्भागी लिंगदेह इंद्रि- यसमुदायरूप आहे असा ज्याविषयीं भास होतो तो एक आहे, तिसरा हल्लीं ज्याविषयीं वाद आहे तो, यांपैकी माझा सर्वान्तर आत्मा तूं कोणता सांगणार ? असें ( उषस्तानें ) झटल्यावर इतर ( याज्ञवल्क्य ) उत्तर देतो. जो मुख, नासिका, ह्यांमध्यें संचार करणाऱ्या प्राणाच्या द्वारें प्राणव्यापार करतो, ज्याच्या प्रेरणेनें प्राणवायु क्रियायुक्त होतो; जो प्राणाचें प्रणयन ( प्रगति ) करणारा तो, कार्यकारणसमुदायरूप जो तूं, त्या तुझा विज्ञानस्वरूप आत्मा होय. बांकी उत्त- 'रांचा ('अपानेनापानीति' इत्यादि उत्तरांचा) ह्याप्रमाणेंच अर्थ करावा. 'अपानी, व्यानी, ' 'ह्यांतील (नीचा ) दीर्घ ईकार आर्ष आहे. कार्यकारणसमुदायांतील (देहांतील ) प्राणाचे वगैरे व्यापार, लांकडी यंत्र चालवावें त्याप्रमाणें, तो करितो; कां तर, नियंत्रण करणारा कोणी सचे- तन असल्याशिवाय लांकडी यंत्राप्रमाणें प्राणाचे चलनवलनादि व्यापार होणार नाहीत: ह्मणूनच विज्ञानमय स्वतंत्र आत्म्याचे देखरेखीखाली प्राणादिक वायु व्यापार करूं लागतात; व ह्मणूनच कार्यकारणसमुदायाहून भिन्न आत्मा जो चलनवलनादि व्यापार उत्पन्न करितो तो आहेच. ऋचा २ – मग पुन्हा त्या उपस्त चाक्रायणानें ह्मटलें कीं, जसें ही गाय, हा घोडा, असे दाखवून ( ही चालते आहे ती गाय, धावतो आहे तो घोडा ) असें एखादा ( अन्य शद्धांनीं ) सांगतों, त्याप्रमाणेंच है ( ब्रह्म ) तूं सांगितलेंस. पण जें प्रत्यक्ष व समक्ष ब्रह्म होय, जो सर्वान्तर आत्मा होय, तो मला दाखीव. ( उत्तर ) तो हा तुझा आत्मा सर्वान्तर. ( प्रश्न ) हे याज्ञवल्क्या, तो सर्वान्तर कोणता ? ( उत्तर ) दृष्टीचा द्रष्टा तुला पाहतां येणार नाहीं; श्रवणाचा श्रोता ऐकतां येणार नाहीं; मनाचा मन्ता मनन करतां येणार नाहीं; विज्ञानाचा विज्ञाता जाणतां येणार नाहीं; तो हा तुझा आत्मा सर्वान्तर त्याहून इतर (सर्व) आर्त ह्मणजे विनाशी आहे. हे ऐकून उपस्त चाक्रायण स्तब्ध झाला. भाष्य - त्या उषस्त चाक्रायणानें झटलें, जसा कोणी मनुष्य प्रथम अन्यथा प्रतिज्ञा करून अडविला ह्मणजे अन्यथा बोलूं लागतो. ही गाय, हा घोडा, असें ह्मणतो; (व तें काय असें विचा- रलें ह्मणजे ) जी चालते (गौर्गच्छति), जो धावतो (अश्व-आशुगंता) तो, असें ह्मणतो. प्रत्यक्ष दाखवितों अशी प्रतिज्ञा करून मागून चालणे, धावणें, वगैरे खुणांच्या भिषानें वर्णन करतो, त्याप्रमाणेच हें ब्रह्म तूं प्राणव्यापारादि खुणांनी वर्णन केलें. फार कशाला ? हें गाय नांव पडण्याचें निमित्त सांगण्याचें कपट सोडून देऊन, जे प्रत्यक्ष व समझ ब्रह्म, (व ) जो सर्वान्तर आत्मा तो मला सांग. दुसरा ( याज्ञवल्क्य ) उत्तर देतो. जशी मी प्रथम प्रतिज्ञा केली की,