पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपस्तब्राह्मण. २०५००- सर्वोतर आत्मा. अध्याय ३, ब्राह्मण ४, ऋचा १ –मग त्याला उपस्त चाक्रायणानें याज्ञवल्क्या, अशी हाक मारून झटलें. जें प्रत्यक्ष व समक्ष ब्रह्म आहे, जो सर्वांतर आत्मा आहे, तो मला सांग ? (उत्तर) तो हा तुझा आत्मा सर्वान्तर. ( प्रश्न ) याज्ञवल्क्या, कोणता तो सर्वान्तर? (उत्तर) जो प्राण- रूपानें प्राणचेष्टा ( हालचाल ) करतो, तो तुझा आत्मा सर्वान्तर, जो अपानरूपानें अपा- नव्यापार करतो, तो तुझा आत्मा सर्वान्तर• जो व्यानरूपानें व्यानव्यवहार करतो, तो तुझा आत्मा सर्वान्तर. जो उदानरूपानें ऊर्ध्वचेष्टा करितो, तो तुझा आत्मा सर्वान्तर. हा तुझा सर्वान्तर आत्मा. भाष्य – मग त्याला उषस्तानें प्रश्न केला. पुण्यपापाच्या कारणानें प्राप्त जालेले ग्रह व अतिग्रह यांनी व्याप्त झालेला आत्मा वारंवार ग्रहातिग्रहांस टाकतो व घेतो, ( आणि अशा रीतीने ) संसार करीत असतो, असें ( मागें ) सांगितलें. पुण्याचा परम उत्कर्ष झटला ह्मणजे (नामरूपांनीं) प्रकट जालेल्या (हिरण्यगर्भस्वरूपांत ) समष्टिव्यष्टिरूपानें द्वैताशीं एकरूप असणारा आत्मा प्राप्त होतो असें सांगितलें; परंतु जो आत्मा ग्रहातिग्रहांनी ग्रस्त होऊन संसार करतो, तो आहे का नाही ? असल्यास त्याचें लक्षण काय ? याप्रमाणें आत्म्या चेंच विवेकानें स्वरूप समजण्याकरितां श्रुतीनें उपस्तप्रश्नाचा आरंभ केला आहे. तो आत्मा उपाधिरहितस्वरूपाचा, व क्रिया आणि क्रियासाधनें ह्यांत सर्वदा अलिप्त राहणाऱ्या स्वभावाचा आहे. असें समजलें ह्मणजे सदरीं सांगितलेल्या बंधनांतून व त्यांच्या मूळ कारणांतून ( कर्मातन ) मुक्त होतो. ही गोष्ट कोणत्या संबंधानें आली हे पुन्हां सांगावयास नको. याज्ञवल्क्य ( जनकसभेत उभा आहे ) त्याला चक्रपुत्र चाक्रायण उपस्त नांवाचा ऋषि यानें प्रश्न केला. जें ब्रह्म प्रत्यक्ष, ह्मणजे कोणत्याही पडद्यानें झांकलेले नव्हें असें, पाहणा- रास अपरोक्ष ह्मणजे समक्ष ( असल्यामुळे ) गौण ( ह्मणजे कल्पित, किंवा श्रुत ) नव्हे श्रोत्र ब्रह्म होय, ( मन ब्रह्म होय ) ह्मणतात, तसल्या ब्रह्माप्रमाणे नव्हे, तें ब्रह्म कोणतें ? तो आत्मा आत्मासंज्ञेनें प्रत्यगात्मा घ्यावयाचा; कां तर, आत्मा शब्द प्रत्यगात्मा ह्या अर्थानें प्रसिद्ध आहे, सर्वाच्या अभ्यंतरी आहे; ह्मणून सर्वान्तर ज्याला ह्मणतात, तो ब्रह्म, ' जें जो ' असे शब्द आले आहेत, त्यावरून प्रसिद्ध आत्मा ब्रह्म असे समजावें. तो आत्मा मला सांग, असा प्रश्न करून जशी एखादी गाय शिंगाला धरून स्पष्ट दाखवावयाची, तसा दाखीव, तो हा, असें सांग, असा (उपस्तप्रश्नाचा अभिप्राय आहे.