पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ बृहदारण्यकोपनिषद. [ अ. ३ ब्रा. ३ लागू आहे. ( संध्यावंदनादि ) नित्यकर्माचें फल विश्वजिन्यायानें आह्मी कल्पित नाहीं. नित्य- कर्माचें फल कोठें सांगितलेलें ही नाहीं. तीं (नित्यकर्मे ) करावी अशी चोदना (धर्माज्ञा ) आहे. तेव्हां पारिशेष्यन्यायानें मोक्ष हें त्यांचें फल असें (मीमांसावादी) समजतात; कारण नित्यकर्माला फल नाही असे मानलें तर ( नित्यकर्माविषयीं कोणीच ) पुरुष प्रवृत्त होणार नाहीत. ( यावर सिद्धांती ) शंका घेतो कीं, मोक्षफल कल्पित घेतल्यामुळे विश्वजिन्न्यायच प्राप्त होतो. मोक्ष किंवा कांहीं अन्य फल ( नित्यकर्मापासून ) होतें अशी कल्पना न केली तर ( त्या- विषयीं ) पुरुषप्रवृत्ति होणार नाहीं; ह्याकरितां ( नित्यकर्माचें ) फल मोक्ष आहे असे अर्थापत्ति- प्रमाण घेऊन विश्वजित् यागामध्यें जशी (फलाची कल्पना करितात, तशीच फलकल्पना कराव- याची असें होईल. ) तशी कल्पना करून ही विश्वजिन्न्याय येत नाहीं हें कसें ह्मणतां ? फलाची कल्पना करण्यांत येते, आणि विश्वजिन्न्याय येत नाही, हें भाषण परस्पर विरुद्ध आहे. ( मोक्षही स्वरूपस्थिति आहे, उत्पन्न होणारी वस्तु नाहीं). मोक्षाला फलरूपताच नाहीं, असें ह्मणूं लागाल तर ( तसें ह्मणतां येणार ) नाहीं; कारण, (तुझीं) आपली प्रतिज्ञा सोडिली असें होईल. (तुमची) प्रतिज्ञा अशी आहे की, कर्मापासून (नेहमीचे कार्याहून ) अन्यकार्य विष दहीं वगैरे पदार्थापासून (आयुर्वृद्धि पुष्टि वगैरे कार्य ) होतें, त्याप्रमाणे ( नित्य ) कर्माचें कार्य होत असतें. मोक्ष हा फल- रूपच आहे असें (ह्मणाल) तरी ती प्रतिज्ञा मोडते; आणि (एक वेळ) मोक्ष हैं कर्माचें कार्य आहे असें ह्मणाल तर मोक्षामध्यें आणि स्वर्गादिक फलांमध्ये फरक कोणता हें तुह्मीं सांगितले पाहिजे. आणखी नित्यकर्माचें फल मोक्ष आहे, तो कर्मकार्य नव्हे, ह्या तऱ्हेवाईक बोलण्याचा अर्थ काय हेंही सांगितले पाहिजे. कार्य शब्द निराळा व फल शब्द निराळा, असें हाटल्याने फरक होतो, असें कल्पितां येणार नाहीं. आणि, मोक्ष हा फल नव्हे; नित्यकर्मापासून उत्पन्न होतो; नि- त्यकर्माचें फल; कार्य नव्हे, असें ह्मणावयास लागाल तर, तुमचें भाषण अग्नि (हा ) थंड आहे, असें ह्मटल्याप्रमाणें परस्परविरुद्ध (असंबद्ध) होईल. ज्ञान (मोक्षास अंतरायभूत अज्ञान दूर करून मोक्ष देतें ) तशीच ही गोष्ट आहे, आणि ज्ञान ( नवा ) मोक्ष उत्पन्न करितें असें नसून, मोक्ष ज्ञानाचें कार्य आहे असेंच ह्मणतात; त्या- प्रमाणें तो नित्यकर्माचें कार्य आहे असें ह्मणूं लागाल तर (तें शोभणार ) नाहीं; कारण, ज्ञाना- च्या अंगी अज्ञान दूर करण्याचें सामर्थ्य आहे. अज्ञानरूपी पडदा ज्ञान दूर करितें त्यावरून मोक्ष ज्ञानकार्य आहे, असें आह्मी लक्षणेनें ह्मणतों; अज्ञान दूर करणें कर्माच्याने होणार नाहीं. जो कर्मानें दूर केला जाईल असा अज्ञानाशिवाय मोक्षाला दुसरा कांहीं पडदा आहे, असें कल्पिणें शक्य नाहीं; कारण, मोक्ष नित्य आहे, व त्याची साधकाशी एकरूपता आहे. १ – विश्वजित् ह्मणून सर्व पृथ्वी जिंकल्यावर याग करतात, तो रघुराजानें केला होता- पहा रघुवंश सर्ग ४. ज्या यज्ञाचें फल श्रुतिनिर्दिष्ट नाहीं त्या यज्ञाचें स्वर्ग हें फल समजावें असा मीमांसकांचा न्याय आहे, त्यावरून विश्वजित् यागाचें स्वर्ग हैं फल घेतात, तसें नित्यकर्माचें स्वर्ग हैं फल घेत नाहींत, असा वादीचा आशय आहे. २ ---पारिशेष्यन्याय ह्मणजे ज्या कर्माला फल सांगितलें नाहीं, पण जें कर्म चुकवले असतां दोष लागतो, त्याचें मोक्षासारखें उत्तम फल असले पाहिजे.