पान:श्रीबृहदारण्यकोपनिषद याचे मराठी भाषांतर अध्याय ३ रा.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋ. १] भुज्युब्राह्मण- पारिक्षित मुक्ति. त्यांपैकी पापकर्मानें स्वभावतः पुष्कळ दुःखांनी भरलेल्या स्थावर जंगम स्वरूपांमध्यें नरकांत, पश्वादि योनींत, पिशाचयोनीत वगैरे ( प्राणी ) पुन्हा पुन्हा जन्मास येऊन व मरण पावून दुःख भोगितो, हा जणूं राजमार्गच आहे; असें सर्व लोकांस माहित झालें आहे. पण जें 'पुण्यकर्मानें पुण्यवान् होतो' असें शास्त्रवचन आहे, त्या विषयींच वरील श्रुतीने आदर दाखविला आहे. सर्व पुरुषार्थ प्राप्त करून घेण्यास पुण्यकर्म हेंच साधन आहे, असें सर्व श्रुति व स्मृति ह्मणतात. मोक्ष हा तरी पुरुषार्थ आहे, त्यावरून मोक्षही पुण्यकर्मानें मिळेल; असें प्राप्त झालें. जो जों पुण्याचा उत्कर्ष होईल तों तों उत्कृष्ट फलप्राप्ति होईल; यास्तव उत्तम पुण्योत्कर्षानें मोक्ष मिळेल अशी शंका येईल, ती दूर केली पाहिजे. ज्ञानसहित उत्तम कर्माचा परिणाम इतका ( संसार उत्पन्न करण्यापुरताच ) आहे; कारण कर्म व त्याचें फल हैं विविध प्रकट होणाऱ्या नामरूपांचें उत्पत्तिस्थान आहे. परंतु जें कार्य नव्हे, नित्य आहे, ज्याचे धर्म अव्याकृत (अप्रकट ) आहेत, ज्याला नाम व रूप नाहीं, व क्रिया, क्रियासाधनें, व फलें यांपैकी कोणाचाही स्वभाव ज्यामध्यें नाहीं, अशा ( ब्रह्मा ) वर कर्माचा अंमल चालत नाहीं. ज्यावर कर्माचा अंमल आहे, तो संसारच, हा अभिप्राय स्पष्टपणें दाखविण्याकरितां ( या ) ब्राह्मणाचा आरंभ आहे. परंतु कांही लोक असें ह्मणतात की, ज्ञानसहित कर्म निष्काम असलें तर विष, दहीं वगैरे' पदार्थाप्रमाणें ( संसाररूपी नेहमीचें कार्य उत्पन्न न करितां ) अन्य-कार्य (मोक्ष) उत्पन्न करितें. तें (ह्मणणे बरोबर ) नाही. कारण मोक्ष उत्पन्न होणारा नव्हे. बंधननाश हाच मोक्ष, तो कार्यरूप नाहीं. अविद्या हेंच बंधन, असें (पूर्वी) आह्मीं सांगितलें. अविद्येचा कर्मानें नाश (होईल हें ह्मणणें ) युक्त नाही. कर्माचें सामर्थ्य दृश्यवस्तूंवरच चालतें. उत्पन्न करणें, मिळविणें, विकारकरणें, संस्कार करणें, हे कर्मशक्तीचे विषय आहेत. उत्पन्न करणें, प्राप्त करून देणें, विकार आणि संस्कार करणें हैं कर्माच्या आटोक्यांत आहे. (दुसरें) लोकांत प्रसिद्ध नाहीं ह्मणून याहून भिन्न गोष्ट कर्माच्या आटोक्यांत नाहीं. (उत्पत्ति, प्राप्ति, विकार, व संस्कार ) या गोष्टींपैकी मोक्ष आहे असें नाहीं. फक्त अविद्येच्या कारणानें ( अज्ञानामुळे मोक्ष) असतो असें आह्मीं (पूर्वी ) सांगितलें आहे. खरें; केवळ कर्माचा हा स्वभाव असो; पण विद्यासहित निरभिलाष कर्माचा प्रकार उलट आहे. ज्यांची निराळी (अपकार करण्याची ) शक्ति प्रसिद्ध आहे असे विष, दहीं आदि- करून (पदार्थ) विद्या (वैद्यक), मंत्र, शर्करा वगैरेशीं संयुक्त केले ह्मणजे त्यांचा निराळाच ( चांगला) परिणाम होतो, असें पाहिलें आहे. त्याप्रमाणें (विद्यायुक्त) कर्माचाही प्रकार घ्यावा, असें ह्मटलें तर, नाहीं; कारण, तसें ह्मणण्याला प्रमाण नाहीं; कांतर कर्माची सत्ता वर सांगितलेलें विषय सोडून इतर विषयांवर असल्याबद्दल प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ति, शब्द, ( यां- पैकी एकही ) प्रमाण नाहीं. कोणी ह्मणेल की, (कर्माचें संसारव्यतिरिक्त ) फल नाहीं, असें ह्मटलें असतां (कर्मावि- षयींची ) चोदना ( विधिवाक्य ) अन्य रीतीनें उपयुक्त होणार नाहीं. हें (अर्थापत्ति ) प्रमाण १ -- नुसतें विष दहीं वगैरे, मृत्यु, ज्वर वगैरे आणणारें आहे तरी मंत्रसंस्कृत विष किंवा शर्करामि- श्रित दहीं केलें असतां शक्ति पुष्टि वगैरे देतें.