पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/167

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पंचायती राज्य सुरू झाल्यावर गावातील जमीनदारांचे वर्चस्व जवळ जवळ संपुष्टात आले व मुस्लिम समाज बहुसंख्य असल्याने ग्रामपंचायत सहाजिकच या समाजाच्या ताब्यात आली. परंतु या समाजातील बहुसंख्य लोक बिगर शेतकरी असल्याने पुढील शेतीसुधारणा किंवा गावच्या सुखसोयी (हरिजनांची घरे, खतांचे खड्डे, गावातील रस्ते इत्यादी) या बाबींकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले. उलट पंचायतीच्या ताब्यातील रहात्या घरांसाठी असलेल्या जमिनी आपल्याच धर्मबांधवांना देण्याचे, जातीयवादाची खोच असलेले धोरण अंमलात आले. हिंदुला हितकारक ते मारकवाईट अशी एक नवीच नीती-प्रवृत्ती गावात उदयास आली. ( A new ethics emerged by which anything benefiting a Hindu was bad.)

नियंत्रणाच्या काळात खानसामा-चिरंजिवांनी एक विणकर सहकारी संस्था काढली आणि सुताचा काळाबाजार करून, अफरातफर करून, हजारो रुपये उकळले. भाईबंदांनी थोडी कुजबुज केली. खानसामाचिरंजिवांनी गावातील मशिदीला एक छोटीशी देणगी जाहीर करून टाकली. तरी कुजबुज थांबत नाही असे पाहून या इसमाने आपल्या घरावर डाका घालवून कागदपत्र चोरीला गेल्याची बोंब ठोकली. पोलीस, सरकारी अधिकारी, पुढारी-सगळेच याला सामील. प्रकरण भिजत पडले, मिटवल जात होते.

खानसामा चिरंजिवांकडे गावचे धार्मिक पुढारीपणही होते. जोडीला थोडी डॉक्टरकी. वरपर्यंत लागेबांधे-त्यामुळे गावावरची या माणसाची दुष्ट पकड उठविणे मोठ नाजुक व अवघड काम होते.

व्यक्तित्व विकास केंद्राने गाव स्वच्छता मोहीम प्रथम हाती घेतली. हिंदूवस्तीत काही अडचण आली नाही. पण मुस्लिम मोहल्ल्यात बंदी. स्वयंसेवकांना दमदाटी. विनोबा त्या सुमारास आसामात होते. केंद्राने याबाबत त्यांचा सल्ला घेण्याचे ठरविले. शिवसागरहून विनोबांचे पत्र आले :

आपण आपली सेवा दुसऱ्यावर लादू नये. सेवा लादली तर तो एक जुलमाचाच प्रकार ठरतो. सेवा सहजभावाने घडावी.

संपादकाचा खोडकरपणा जागा झाला. तो लिहितो : विनोबांना बहुधा आपल्या शिष्याच्या शरीराची काळजी वाटत असावी. (बिचान्यावर लाठीहल्ला झाल्याचा बातमी एव्हाना त्यांच्यापर्यंत पोचलेली होती.) नाहीतर बनारसला पदयात्रा पोचला असता, मुक्काम वाढवून, विनोबांनी बनारस स्वच्छ करण्याची सेवा तथाले लोकांवर स्वतः लादलीच होती नं ?

तेव्हा विनोबा आता काहीही म्हणोत. आपण पुढे जायचे. धर्मवेडाचा या किल्ल्यावर आणखी एक धडक मारायची.

। १६० ।