पान:शेती-पशुपालन.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संदर्भ : (१) सामान्य विज्ञान, इ.७वी, प्रकरण ११, पशुसंगोपन, पान नं.९०, घटक - कुक्कुटपालन. (२) भारत : मानवी पर्यावरण, इ.१०वी, (भूगोल) प्रकरण ७, पशू संसाधने, पान नं.३०, घटक - कुक्कुटपालन, प्रकाशन -२००७. (३) सामान्य विज्ञान, इ. ८ वी, प्रकरण ११, सूक्ष्मजीव, पान नं.११०, घटक - प्राण्यांत आढळणारे रोग, प्रकाशन - २०००. दिवस : सातवा प्रात्यक्षिक : दुधातील फॅट टेस्ट करणे. उद्देश: दुधातील फॅट तपासणे. अपेक्षित कौशल्य : (१) साहित्य हाताळता येणे. (२) स्निग्धांश ओळखता येणे. (३) रिडींग घेता येणे. साहित्य व साधने : गर्बर सेंटर फ्युज मशीन, ब्युट्रोमीटर १०.७५ मि.ली.पिपेट १ मि.ली. रबरी बूच, रेग्युलेटींग पीन, स्टैंड मेजरींग सिलेंटर इ. रसायने : सल्फुरिक (H.So.) अॅसीड,अमाईल, अल्कोहोल इ. कृती: (१) प्रथम ब्युट्रोमीटरमध्ये १ मि.ली.अमाईल अल्कोहोल पिपेटच्या साहाय्याने घ्या. (२) नंतर मेजरिंग सिलेंडरच्या साहाय्याने HSO.9m|घेऊन ते ब्युट्रोमीटरमध्ये सावकाश सोडा. (३) १०.७५ मि.ली. क्षमतेच्या पिपेट घेऊन त्यात दूध ब्युट्रोमीटरमध्ये सोडा. (४) रेग्युलेटींग पीनने ब्युट्रोमीटरला रबरी बूच बसवा, त्यातील मिश्रण चांगले ५-६ वेळा हालवावे. (५) वॉटर बाथमध्ये (६५ ला) ब्युट्रोमीटर ठेवा (५ मिनिटे) (६) त्यानंतर दोन्ही ब्युट्रोमीटरल सेंट्रीफ्युज मशीनमध्ये ठेवून ते सेंट्रीफ्युज गर्बर मशीन जोराने फिरवा (साधारण ५ मिनिटे) (७) सेंट्रीफ्युज मशीनमधून ब्युट्रोमीटर बाहेर काढा. ब्युट्रोमीटरच्या वरील भागात जो पिवळसर भाग आहे. (स्निग्धांश) त्याचे वाचन करा.जो अंक येईल ते दुधातील फॅट असेल. तत्त्व : दुधात प्रथिने व फॅट (तूप) असते. प्रथिनांमुळे फॅट सहज तरंगत नाही व दुधात पसरलेले असते. सल्फ्युरीक अॅसीडमध्ये सर्व प्रथिने विरघळतात व फॅट मुक्त होते. ते वर येण्यात मदत व्हावी म्हणून 1ml अमाईल अल्कोहोल व सेंट्रीफ्युज वापरतात. फॅट तरंगते त्याचे आकारमान वाचतात. ५२