पान:शेती-पशुपालन.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५ , वस्तुची मजूरी सूत्र: मजूरी = १००४ एकूण किंमत मजूरा = १००-५०.१५ ।। .१००xx=२५४५०.१५ १२५३.७५ .:.१००x१२५३.७५ ... x = . .:. x = १२.५३ . मजूरी = १२ रू.५३ पैसे १०० .:. गायीचा एका दिवसाचा खर्च = ५०.१५+ १२.५३ = ६२.६८ = ६२ रू.६८ पैसे .:.३० दिवसांचा TDN नुसार खर्च = ३०४६२.६८ = १८८०.४० = १८८०रू.४० पैसे .:. एका गायीचा महिन्याचा TDN नुसार आहारावरील एकूण खर्च १८८० रू. ४० पैसे येतो. संदर्भ : सामान्य विज्ञान, इ.८वी, प्रकरण १२, पान नं.११७, घटक - जनावरांचे आंबोण, प्रकाशन - २०००. दिवस : सहावा प्रात्यक्षिक : ब्रॉयलर पक्षी वाढविणे, प्रस्तावना : भारत शेतीप्रधान देश असून शेती बरोबरच पशुपालनाला जादा महत्त्व दिले जाते. या पशुपालनाबरोबरच कुक्कुटपालनासही महत्त्व दिले जाते. कुक्कुटपालन हे लहान तसेच मोठया प्रमाणावरही केले जाते. कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांसाठी जादा नफा व कमी खर्च होणारा फायद्याचा व्यवसाय आहे. ज्यातून जास्तीत जास्त पैशाच्या स्वरूपात उत्पन्न मिळते. तर आता आधुनिक पद्धतीने कुक्कुटपालन कसे केले जाते याविषयी माहिती पाहू. पूर्व तयारी : उपक्रमांची निवड : (१) १००० पक्षी असणाऱ्या पोल्ट्रीस भेट द्या, तेथील व्यवस्थापनाची पाहणी करा. (२) पोल्ट्रीला भेट देऊन तेथील पिलांना लासोटा लस द्या. (३) शाळेत १०० पक्ष्यांची पोल्ट्री तयार करा व त्यांची वाढ करून विक्री करा. (४) ५००० पक्ष्यांच्या पोल्ट्रीस भेट देऊन त्यांना आलेल्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा. निदेशकाने करावयाची पूर्व तयारी : (१) पोल्ट्री मालकाची पूर्वपरवानगी घेऊन ठेवा. (२) पिलांना लसीकरण करण्यासाठी लसी आणा. (३) पिलांना झालेल्या आजारानुसार औषधे आणा. (४) पिलांना खाद्य देण्यासाठी खाद्य अगोदर घेऊन या. (५) पिलांची खरेदी करून ठेवा. (६) पिलांसाठी अगोदर पिंजरा बनवून घ्या. (७) प्रथम मुलांना कुक्कुटपालनाविषयी सी.डी. दाखवा. प्रात्यक्षिकाची पूर्वतयारी : (१) मुलांना सी.डी. दाखवा (कुक्कुट पालनाची) (२) पोल्ट्रीवर मुलांना घेऊन जा. (३) पिलांना /कोंबड्यांना लसीकरण करा. (४) पिलांना खाद्य द्या. पाणी द्या. (५) E.C.R. कसा काढतात. अपेक्षित कौशल्ये : (१) पोल्ट्रीचे व्यवस्थापन करण्यास शिकणे. (२) पक्ष्यांची वाढ करणे व विक्री करता येणे. (३) लस देता येणे. (४) इंजेक्शन देता येणे. (५) एक बॅचचे अंदाजपत्रक काढता येणे. कोंबडी पालनः मांसासाठी प्रकार - ब्रॉयलर,कॉकरेल(लेअरर जातीतील नर) अंड्यांसाठी प्रकार - लेअर, गावठी . पद्धती: (१) मोकाट (२) गादी (३) पिंजरा ४७