पान:शेती-पशुपालन.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) पिकांच्या निदेशकांनी लक्षात घ्यावयाच्या बाबी : (१) रोग पडलेल्या पिकांची पाहणी करून ठेवणे. पिकांच्या प्रकारानुसार रोग/ किडीची पाहणी करून ठेवणे. (३) विविध रोगांची/ किडींची माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचे स्वतंत्र गट करणे, (४) किडीनुसार फवारणीच्या वेळा ठरवून घेणे. (५) या प्रात्यक्षिकासंबंधी सी.डी. दाखवण्याची व्यवस्था करून ठेवणे. प्रात्यक्षिक: कीड ओळखणे व तिचे मोजमाप करणे. अपेक्षित कौशल्ये: (१) किडींची माहिती घेणे. (२) किडींच्या हंगामाची माहिती घेणे. साहित्य : बहिर्वक्र भिंग, वही, पेन, टेप, पट्टी इ. कृती: (१) किडीचे निरीक्षण करण्यासाठी जवळच्या शेतावर जाणे, (२) त्या ठिकाणच्या पिकांचे निरीक्षण करणे. (३) त्या ठिकाणच्या पिकांवर कोणती कीड पडली आहे ते पाहणे. (४) त्या किडीचा अथवा अळीचा रंग व आकार कसा आहे ते पाहणे व नोंद करणे, त्या किडीस अथवा अळीस पाण्यातील रस शोषण्यासाठी सोंड आहे का ते पाहणे. (६) त्या किडीस अथवा अळीस किती पाय आहेत, याची नोंद करणे, (७) पकडलेली कीड अथवा अळी झाडाची पाने खाते,शेंडा पोखरते, खोड पोखरते ते पाहणे. (८) पकडलेली कीड एखादे फळ पोखरते का ते पाहणे, खालील निरीक्षणांवरून कीड कोणती ते ओळखा. (अ) पाने खाणारी अळी/कीड (ब) फळ पोखरणारी अळी/कीड (क) शेंडा पोखरणारी अळी/कीड (ड) रस शोषणारी अळी / कीड (इ) पानांना भोके पाडून हरितद्रव्य खाणारी अळी / कीड यांच्याशिवाय दुसरी कोणत्या प्रकारची कीड आहे का ते पाहणे. किडीचे निरीक्षण केल्यानंतर ती किती प्रमाणात आहे हे ठरविण्यासाठी त्या क्षेत्राचे १x१ चौरस मीटर भागातील पिकाचे निरीक्षण करणे व त्यानुसार संपूर्ण क्षेत्राचे कीड़ भागाचा अंदाज व्यक्त करणे. (उदा. १x१ चौ. मी. क्षेत्रात जर १०० रोपे असतील तर त्यापैकी किती रोपांवरती कीड पडली आहे ते मोजून घ्यावे. जर १०० पैकी ३५ रोपांवर कीड पडली असेल तर किडीचे प्रमाण ३५% आहे असे म्हणता येईल. त्यावरून संपूर्ण क्षेत्राचे परसेंटेज (टक्केवारी) काढा. लोकोपयोगी सेवा :(१) शेतकऱ्यास त्याच्या पिकावर पडलेल्या रोगाविषयी माहिती द्या व औषध फवारणी करा. (२) गावात तालुका कृषी साहाय्यकास बोलावून शेतकऱ्यांना विविध रोगांविषयी माहिती द्या. संदर्भ : (१) सामान्य विज्ञान, इ.८वी, प्रकरण११,सूक्ष्मजीव, पान नं.१११-११२, वनस्पतीतील रोग, प्रकाशन २०००. (२) मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (V1),इ.१०वी, प्रकरण ३.१,किडी नियंत्रण,पान नं. १३९-१४५ (अ) ग्रामीण तंत्रज्ञान - भाग १, पान नं.५६ (ब)ग्रामीण तंत्रज्ञान-हस्तपुस्तक, पान नं.८५-९१. १०