पान:शेती-पशुपालन.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कीड नियंत्रण म्हणजे काय? जेव्हा कीटक/इतर सजीव (बुरशी, मावा, तुडतुडे, अळी इ.) यांच्यामुळे पिकांचे /फळझाडांचे नुकसान होते. तेव्हा त्या किडीपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणे यास कीड नियंत्रण म्हणतात. कीड नियंत्रणाचे प्रकार: (१) भौतिक किड नियंत्रण : किड हाताने गोळा करून टाकणे. (२) रासायनिक किड नियंत्रण : विविध रासायनांचा वापर करून किडींचा बंदोबस्त करणे. (अ) बाह्यप्रवाही किटक नाशके : चघळणाऱ्या किंवा कुरतडणाऱ्या किडीसाठी उदा. : आळ्यांच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोकॉस वापरतात. (ब) आंतरप्रवाही किटक नाशके : रस शोषणाऱ्या किडीसाठी. उदा. : फुलकिडीच्या नियंत्रणासाठी वापरतात. (३) जैविक किड नियंत्रण पूर्व तयारी :(१) प्रात्यक्षिक सुरू होण्यापूर्वी/करण्यापूर्वी प्रात्यक्षिकास लागणारे सर्व साहित्य जमा करावे. उदा.कीटक निरीक्षणासाठी सूक्ष्मदर्शक, बहिर्वक्र भिंग, वही, पेन इ. (२) मुलांचे ३ गट (प्रत्येकी ५) करावेत व कामे वाटून द्यावीत. (३) काही कीटक विषारी असतात, त्यांपासून योग्य ती काळजी घ्यावी. (४) किडीचे निरीक्षण करण्यासाठी योग्य वेळ (सकाळ - योग्य) निवडा. उपक्रमांची निवड करणे : (१) आपल्या शाळेतील फुलझाडांवर पडलेल्या किडीविषयी माहिती गोळा करा व तिचे प्रमाण सांगा. (२) तुमच्या शेतातील पिकांवर पडलेल्या विविध कीड व रोगाच्या क्षेत्राचे मोजमाप करा. (३) फळझाडे, फुलझाडे, पालेभाज्या यांवर पडणारे रोग/ किडी या वेगवेगळ्या कीड असतात का याचे निरीक्षण करा व ते किती टक्के असते ते ठरवा. (1m मधील किड मोजुन.) (४) शाळेच्या शेजारच्या शेतक-याच्या शेतावर जाऊन त्याच्या पिकावर पडलेल्या रोग / किडीविषयी माहिती सांगा. अपेक्षित कौशल्ये: (१) बहिर्वक्र भिंग/सूक्ष्मदर्शिका हाताळता येणे. (२) वेगवेगळ्या किडी ओळखता येणे. (३) किडींचे प्रमाण ठरविता येणे. (४) किडीनुसार उपाय ठरविता येणे. विशेष माहिती सेंद्रिय पद्धतीने कीड नियंत्रण(१) किडनाशक म्हणून पानांचा उपयोग - कडूनिंब,उन्हाळी कण्हेर, कारली, तंबाखू, निरगुडी, एरंड, रूई, निलगिरी, दगडीपाला, हिरवी मिरची, काळा/पिवळा धोतरा इ. (दशपर्णी अर्क) (२) किडनाशक म्हणून बियांचा वापर - कडूनिंब, उन्हाळी करंज, जमालगोटा, रानतुळस, सीताफळ इ. (उदा. कडूनिंबाच्या बियांपासून निंबोळी अर्क तयार करणे.)