पास झालेल्या माणसाला किती हे तपासून पाहिले पाहिजे. शेतकरी मातीची परीक्षा करतो, जमिनीत खोद किती आहे, पाणी कुठपर्यंत लागतं, जमीन कोणत्या प्रकारची आहे हे त्याला माहिती असतं. निदान आपापल्या भागामधल्या भूगर्भशास्त्राची / भूस्तरशास्त्राची शहरी माणसाला किती माहिती असते ते तपासून पाहा. प्रत्येक शास्त्राची थोडी थोडी माहिती शेतकऱ्याला असतेच. आपण सामान्य ज्ञानाचा विचार करतो आहोत. शेतकरी हा काही विद्वान नसतो, पण त्याला पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, कीटकशास्त्र या प्रत्येकाचे सानुभव ज्ञान असते. शेतीच्या कारभाराला तर कोणत्या हंगामात कोणतं पीक घ्यावं, पीक आल्यानंतर कोणत्या वेळी ते बाजारात नेलं म्हणजे अधिक फायद्याचं होईल याचे वेळोवेळी आडाखे बांधावे लागतात. अशा अनेक दृष्टीनं शेतकऱ्याला शेतीच्या कामात डोक्याचा-बुद्धीचा वापर अवश्य करावा लागतो.
शेती उत्पादनाच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उत्पादनखर्च आलेले दिसतात त्यामुळे काही मंडळी चिंतातुर झालेली दिसते. त्यांना काळजी वाटते की रास्त किंमत मिळू लागली तर काही शेतकऱ्यांना खूप फायदा होईल तर काहींना खूप तोटा होण्याची शक्यता आहे.
वेगवेगळे साखर कारखाने घेतले तरी त्यांचा उत्पादनखर्च सारखा नसतो. उत्पादन खर्चातील ही तफावत फक्त शेतीतच नसते; इतरत्रही आहे. एकच गोष्ट तयार करणाऱ्या १० कारखान्यांत उत्पादनखर्च वेगळा आहे. त्यांच्या हिशोबात जी पद्धत वापरली जाते तीच आपण वापरतो.
जमिनीची महसुलाची किंमत धरण्याऐवजी बाजाराची किंमत धरली तर यातील जवळ जवळ निम्मे खर्च कमी होतील. अर्थात् अशास्त्रीय शेती किंवा अकार्यक्षमता यामुळे येणारे फरक भरून निघणार नाहीत. तशी अपेक्षाही करू नये. शेवटी तो माल लोकांना विकत घेऊन खाता आला पाहिजे. तरीसुद्धा शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी यावा यासाठी सध्या आम्ही काही युक्ता योजल्या आहेत. कारण आम्हांला 'उडतं' मागायचं नाही. किमान जरी मागितलं तरी आज आहेत त्याच्या दुप्पट भाव होतात. जर पाच पटीनं भाव मागितले, मागताना आनंद होईल, तर ते मिळणारही नाहीत आणि मिळाले तर संपूर्ण देशाची आर्थिक व्यवस्था एका वर्षात कोलमडून पडेल. उदाहरणार्थ, गाईच्या दुधाला आम्ही रु. ३.८० दर लिटरला मागण्याचा विचार करीत आहोत. हा भाव ठरवताना आम्ही काय गृहीत धरलं आहे? शेतकरी
पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/३३
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे