पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पालेकर, देवीदास गणपत न्यायपालिका खंड सीमावादासंबंधीचे होते; यामध्ये पालखीवाला यांनी भारताची बाजू एका आंतरराष्ट्रीय लवादासमोर मांडली. दुसरे प्रकरण जानेवारी १९७१ मधील विमान-अपहरणातून उद्भवले. त्यातही पालखीवाला यांनी पाकिस्तानविरुद्ध भारताची बाजू अगोदर आंतरराष्ट्रीय नागरी विमानवाहतूक संघटनेच्या कार्यकारी मंडळासमोर आणि त्यानंतर अपिलात हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली. आपल्या उमेदवारीच्या काळातच वकिलीसोबतच पालखीवाला कंपनी क्षेत्रातही पुढे आले. १९५९ मध्ये ते आय.सी.आय.सी.आय.च्या संचालक मंडळाचे सदस्य झाले. १९७७ पर्यंत ते त्या मंडळावर होते. १९६१ मध्ये ते टाटा समूहाचे कायदेशीर सल्लागार झाले. नंतर ते अनेक टाटा कंपन्यांच्या संचालक मंडळांवर होते. अखेरपर्यंत त्यांचा टाटा समूहाशी घनिष्ठ संबंध राहिला. १९६३ पासून १९७० पर्यंत ते रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचे सदस्य होते. १९६७ मध्ये ते ए.सी.सी. या सिमेंट कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि १९६९ मध्ये अध्यक्ष होते. १९७७-१९७९ हा दोन वर्षांचा काळ वगळता ते १९९७ पर्यंत ए.सी.सी.चे अध्यक्ष होते. १९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तारूढ झाले, तेव्हा पालखीवाला यांची भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून नियुक्ती झाली. ऑक्टोबर १९७७ पासून जून १९७९ पर्यंत ते राजदूतपदावर होते. नुकत्याच संपलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर त्यांची नेमणूक झालेली असल्याने त्यांचे अमेरिकेत मोठे स्वागत झाले. पावणेदोन वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेत १७१ जाहीर व्याख्याने दिली. याशिवाय वृत्तपत्रांना आणि वाहिन्यांना मुलाखती दिल्या. न्यू जर्सी राज्यातील प्रिन्स्टन विद्यापीठ आणि विस्कॉन्सिन राज्यातील लॉरेन्स विद्यापीठ यांनी पालखीवालांना सन्माननीय डॉक्टरेट दिली. १९५७ मध्ये ‘फोरम फॉर फ्री एन्टरप्राईज्’च्या विद्यमाने त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर पहिले व्याख्यान दिले. ते श्रोत्यांना फार आवडले. मग पालखीवाला दरवर्षी अर्थसंकल्पावर व्याख्यान देऊ लागले. दरवर्षी गर्दी वाढू लागली. कोठलेही बंद सभागृह अपुरे पडू लागले; अखेर १९८३ पासून हे व्याख्यान ब्रेबॉर्न स्टेडियमवर होऊ लागले! नानी अमेरिकेत राजदूत असतानाची १९७८ आणि १९७९ ही दोन वर्षे सोडल्यास, १९९४ पर्यंत त्यांनी अखंडपणे ही व्याख्याने दरवर्षी दिली. भारतीय विद्याभवनशीही पालखीवाला यांचा दीर्घकाळ घनिष्ठ संबंध होता. अनेक वर्षे ते त्याचे उपाध्यक्ष होते. त्यांची ‘इंडियाज् प्राइसलेस हेरिटेज’ आणि ‘इसेन्शियल युनिटी ऑफ ऑल रिलिजन्स’ ही आणि त्यांच्या निवडक लेखांचा व भाषणांचा संग्रह, अशी तीन पुस्तके भवनने प्रकाशित केली. मुंबई विद्यापीठाने पालखीवाला यांना जानेवारी १९९८ मध्ये सन्मान्य डॉक्टरेट दिली व त्याच वर्षी २६जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ‘पद्मविभूषण’ सन्मान देऊन शासनाने त्यांचा गौरव केला. विसाव्या शतकात मुंबईला, महाराष्ट्राला आणि देशाला ललामभूत ठरलेल्या महान व्यक्तींमध्ये नानी पालखीवाला यांचे नाव कायम घेतले जाईल. -शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. एम. व्ही. कामत; ‘नानी ए. पालखीवाला : ए लाईफ’; हे हाऊस इंडिया, २००७

पालेकर, देवीदास गणपत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ४ सप्टेंबर १९०९-९ डिसेंबर २००४ देवीदास गणपत पालेकर यांचा जन्म उत्तर कन्नड (कारवार) जिल्ह्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण कारवार येथील सरकारी हायस्कूलमध्ये महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये आणि कायद्याचे शिक्षण गव्हर्नमेंट लॉ महाविद्यालयमध्ये झाले. बी. ए. आणि एलएल.बी. या पदव्या संपादन प | ९४ शिल्पकार चरित्रकोश