पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड तारकुंडे, विठ्ठल महादेव तत्त्वज्ञानाशी परिचय झाला आणि ते रॉय यांचे अनुयायी (म्हणजे रॉयवादी किंवा ‘रॉयिस्ट’) बनले. १९३९मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षातून बाहेर पडून ते रॉयवाद्यांनी काँग्रेसमध्येच राहून स्थापन केलेल्या ‘लीग ऑफ रॅडिकल काँग्रेसमेन’ या गटाचे सदस्य बनले. १९३९मध्येच दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर धोरणात्मक मतभेदांमुळे या गटाच्या काही सदस्यांना काँग्रेसमधून काढून टाकले गेले. या मंडळींनी मग १९४०च्या अखेरीस मूलगामी लोकशाहीवादी पक्ष (‘रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी’) हा नवीन पक्ष स्थापन केला. तारकुंडे यांनी काँग्रेस सोडली आणि ते या नव्या पक्षात गेले. १९४२मध्ये त्यांनी वकिली सोडली आणि ते या पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. १९४४मध्ये त्यांची पक्षाचे सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली. ते दिल्लीला गेले आणि १९४८पर्यंत तेथे होते. १९४६मध्ये एम. एन. रॉय यांनी ‘इंडियन रिनेसन्सि इन्स्टिट्यूट’ या संस्थेची स्थापना केली. तारकुंडे या संस्थेच्या संस्थापक-विश्वस्तांपैकी एक होते. १९४८च्या आसपास रॉय आणि त्यांच्या सहकार्‍यांनी नवमानवतावादाची सैद्धान्तिक मांडणी केली. यालाच नंतर मूलगामी मानवतावाद असे नाव मिळाले. राजकीय पक्ष आणि संसदीय लोकशाही या दोन्ही गोष्टी लोकांचे प्रश्न सोडविण्यास असमर्थ आहेत, आणि साम्यवादाचा र्‍हास होऊन त्याची जागा एकाधिकारशाहीने घेतली आहे, या मूलगामी मानवतावादाच्या दोन प्रमुख धारणा किंवा सिद्धान्त होत. रॉय यांनी आपल्या नव्या तत्त्वज्ञानाची मांडणी बावीस सूत्रांमध्ये (‘ट्वेन्टी-टू थीसीज्’) केली. त्यांचे सविस्तर विवेचन तारकुंडे यांनी १९८३मध्ये लिहिलेल्या ‘रॅडिकल ह्युमॅनिझम : द फिलॉसॉफी ऑफ फ्रीडम अ‍ॅन्ड डेमोक्रसी’ या आपल्या पुस्तकात केले आहे. तारकुंडे यांनी पुस्तक असे हे एकच लिहिले. त्यांचे बाकी सर्व लिखाण लेख, निबंध आणि अग्रलेखांच्या स्वरूपात आहे. १९४८मध्येच रॉय यांनी मूलगामी लोकशाहीवादी पक्ष अधिकृतपणे विसर्जित केला. याची काहीशी पूर्वकल्पना तारकुंडे यांना असावी, कारण ते त्या आधीच, म्हणजे जून १९४८मध्ये मुंबईला आले आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिली सुरू केली. थोड्याच काळात वकिलीत त्यांचा जम बसला. १९५७मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १५ सप्टेंबर १९६९ रोजी ते मुदतीपूर्वीच राजीनामा देऊन निवृत्त झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे न्यायाधीश म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी न्यायालयाच्या मूळ शाखा आणि अपील शाखा या दोन्ही विभागांत यशस्वीपणे काम पाहिले. त्यांच्यासमोर युक्तिवाद करणे हे वकिलांना एक बौद्धिक आव्हान वाटे. करड्या शिस्तीचे आणि स्पष्टवक्ते न्यायाधीश म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या एका तपाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले. सोफी केली खटला, जेठवानी खटला आणि ठाकरसी खटल्यातील त्यांचे निर्णय विशेष उल्लेखनीय म्हणता येतील. न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यावर न्या. तारकुंडे मुंबईहून पुन्हा दिल्लीला गेले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (आणि क्वचित दिल्ली उच्च न्यायालयात) वकिली सुरू केली. वकिलीच्या या ‘दुसर्‍या डावा’तही त्यांनी एक श्रेष्ठ वकील म्हणून लौकिक मिळविला. परंतु या काळात त्यांचे खरे नाव झाले ते मूलगामी मानवतावादाचे रॉय यांच्यानंतरचे थोर तत्त्वज्ञ आणि एकाधिकारशाही विरुद्ध आणि लोकांच्या मानवी हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे एक खंदे कार्यकर्ते म्हणून. १९७०मध्ये ‘इंडियन रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन’ स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. या संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९८४ पर्यंत त्यांनी हे पद सांभाळले. १९७० ते १९९३ पर्यर्ंत ते ‘इंडियन शिल्पकार चरित्रकोश