पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जयकर, मुकुंदराव रामराव न्यायपालिका खंड सदस्य होते. महाराष्ट्राला एक विद्यापीठ असावे या मागणीला त्यांचा पाठिंबा होता. मुंबई विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा सुचविण्यासाठी मुंबई सरकारने नेमलेल्या चिमणलाल सेटलवाड समितीचे जयकरही एक सदस्य होते. समितीने महाराष्ट्रासाठी वेगळ्या विद्यापीठाची शिफारस केली. आपल्या वेगळ्या टिपणात जयकरांनी महाराष्ट्राबरोबरच गुजरातसाठीही वेेगळ्या विद्यापीठाची शिफारस केली. महाराष्ट्रासाठीचे विद्यापीठ पुण्याला असावे, असेही समितीने म्हटले, परंतु हे स्वप्न साकार होण्यास दोन दशकांहून अधिक काळ जावा लागला. अखेर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १० फेब्रुवारी १९४९ रोजी पुणे विद्यापीठ अस्तित्वात आले. जयकर या नव्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले. त्यावेळी कुलगुरुपद हे पगारी नसून मानसेवी (ऑनररी) होते. सात वर्षांच्या आपल्या धवल कारकिर्दीत जयकरांनी पुणे विद्यापीठाचा सर्वार्थांनी पाया घातला. १९५६मध्ये ते कुलगुरुपदावरून निवृत्त झाले. आपल्या ग्रंथालयाला जयकरांचे नाव देऊन विद्यापीठाने त्यांचे नाव अजरामर केले. - सविता भावे संदर्भ : १. कुलकर्णी व्ही. बी.; ‘एम. आर. जयकर’; प्रकाशन विभाग, १९७३.

शिल्पकार चरित्रकोश