पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्माण ग्रुप ऑफ कंपनीज


 "To be among the top 5 builder-developers in India, and among the top 25 in the world while being the leader in the affordable housing sement by creating better lifestyles and better environments through state of the art townships at affordable rates.'
 हे ब्रीदवाक्य घेऊन आज निर्माणची वाटचाल सुरू आहे. १९९५ साली अजित मराठे आणि राजेंद्र सावंत या दोन युवकांनी भागीदारीत सुरू केलेल्या ह्या फर्मचे रूपांतर आता निर्माण रिअल्टर्स अॅन्ड डेव्हलपर्स लि. अशा पब्लिक लिमिटेड कंपनीत झाले आहे. येत्या २ ते ३ वर्षांत या कंपनीचा पब्लिक इश्यू बाजारात येणार आहे आणि आज फक्त एक कंपनी न राहता अनेक कंपन्यांचा हा निर्माण ग्रुप तयार झाला आहे. सतीश गानू हे ग्रुपचे संचालक असून मुख्यत्वे अँडिंग अँड मार्केटिंग स्ट्रैटेजी या महत्त्वाच्या खात्यांची धुरा ते समर्थपणे सांभाळीत आहेत.
 निर्माण रिअल्टर्स अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या अंतर्गत मुख्यतः बिल्डर-डेव्हलपर म्हणून विविध ठिकाणी जागा विकत घेऊन तेथे विविध प्रकारचे प्रकल्प, मुख्यतः निवासी प्रकल्प उभे केले जातात. असे ४० प्रकल्प विविध स्तरांवर, विविध ठिकाणी सुरू आहेत. कांदिवली, मालाड, जोगेश्वरी, महालक्ष्मी, पालें, गोवंडी, नेरळ, रत्नागिरी, गणपतीपुळे, माणगाव (गोरेगाव), गोवेले या ठिकाणी प्रकल्पांचे काम सुरू आहे. झोपडपट्टी पुनर्विकास, जुन्या चाळींचे पुनर्वसन, बंगलो स्कीम, सेकंड होम प्रोजेक्टस अशा विविध प्रकारांत हे प्रकल्प येतात आणि यांतील ९० टक्के प्रकल्प हे अॅफोरडेबल हाउसिंग या प्रकारात मोडतात. यातील महालक्ष्मीचा प्रोजेक्ट मात्र क्लास हाउसिंग या प्रकारात गणला जातो. मुंबईच्या रेसकोर्ससमोर तसेच महालक्ष्मी स्टेशनजवळ २०३ भाडेकरूंच्या पुनर्वसनाचा हा प्रकल्प आहे.
 खत्या अर्थाने निर्माण ग्रुपचे नाव झाले ते नेरळ येथील सेकंड होम प्रोजेक्टसमुळे. तेथल्या प्रकल्पाला २००८ चे ‘बेस्ट सेकंड होम्स प्रोजेक्ट' हे अॅकोमोडेशन टाइम्सचे अॅवॉर्ड मिळाले. आज सेकंड होम प्रोजेक्टमध्ये नेरळ येथे ‘निर्माण नगरी ‘निसर्ग निर्माण', तसेच ‘माथेरान व्हॅली' हे प्रकल्प उभे राहत आहेत. या सेकंड होम प्रोजेक्टचे नाव ख-या अर्थाने सर्वदूर पोचवले ते नेरळ स्टेशनपासून १ कि. मी येथे असलेल्या निर्माण नॅनो सिटी' या प्रोजेक्टमुळे. मंदीच्या काळात बांधकाम व्यावसायिक नवीन प्रकल्प सुरू करायला घाबरत असतानाही निर्माण ग्रुपने सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा चार ते साडे चार लाख रुपये किमतीच्या घरांचा 'निर्माण नॅनो सिटी' हा प्रोजेक्ट जाहीर केला.
 ‘बिल्डरच्या हाताखाली बिल्डर' ही संकल्पना निर्माणने अतिशय उत्तमरीत्या राबवून अधिकाधिक मराठी लोकांनी बांधकाम व्यवसायात यावे या दृष्टीने 'निर्माण ट्रेनिंग अँकेडमी' प्रयत्न करते. प्रत्येक बुकिंगमागे रु.५०००/- हे ‘निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट'च्या खात्यात जमा होऊन त्यातून माणगावचे १०० विद्यार्थी व मुंबईतील काही अनाथाश्रमांतील विद्यार्थीदिखील या योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहेत. पर्यटन, संगणक, इंग्रजी संभाषण, कृषीविषयक अभ्यासक्रम आदी अभ्यासक्रमांद्वारे कोकणातील उद्योगधंद्यांना पूरक असे मनुष्यबळ विकसित करण्याकरिता माणगाव जिल्हा रायगड येथील आय.आय.टी. केंद्रात शासनाच्या सहयोगाने नवीन अभ्यासक्रम 'निर्माण'ने चालू केले आहेत. पर्यटनक्षेत्र महाबळेश्वर येथून जवळच पोलादपूर येथे नवीन आय.टी.आय.ची स्थापना करून हॉटेल व्यवस्थापनाला पूरक आणि त्या संदर्भात उपयुक्त अभ्यासक्रमांची सुरुवात केली आहे, असे निर्माण ग्रुपचे संचालक सतीश गानू यांनी सांगितले आहे. हा सामाजिक दृष्टिकोन ठेवून ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण ह्न शिल्पकार चरित्रकोश' या प्रकल्पास निर्माण सहकार्य करीत आहे.

शिल्पकार चरित्रकोश

न्यायपालिका खंड । ५