पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड भोसले, शामू चंद्राप्पा भोसले, विश्वनाथ तुकाराम भूसेना - सुभेदार मेजर, मानद कॅप्टन वीरचक्र ९ जून १९३१ विश्वनाथ तुकाराम भोसले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वडूज तालुक्यातील आरले या छोट्याशा गावात झाला. दि. ९ जून १९५० रोजी ते दुस-या महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले. | १९७१ मध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात त्यांनी देदीप्यमान कामगिरी बजावली. विश्वनाथ भोसले हे महार रेजिमेंटच्या एका प्लॅटूनचे कमांडर होते. दि. १२ डिसेंबर १९७१ रोजी रात्री झालेल्या युद्धात या प्लॅटूनने राजस्थान सेक्टरमधील एका भागावर कब्जा मिळवला होता. या भागावर कब्जा केल्यानंतर प्लॅटूनच्या पुनर्रचनेला सुरुवात झाली. त्याच वेळी शत्रू प्रतिहल्ला करायच्या तयारीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे पाहताच भोसले यांनी त्वरित पुढाकार घेतला. त्यांच्या प्लॅटूनमधील दोन सेक्शन त्यांनी बरोबर घेतले. प्रतिहल्ल्याची तयारी करणा-या शत्रूवरच त्यांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे शत्रुसैन्य पुरते गर्भगळीत झाले. तीन इंची उखळी तोफा आणि प्रचंड दारूगोळा जागेवरच टाकून शत्रुसैन्य पळून गेले. भोसले यांनी पाच शत्रुसैनिकांना बंदी बनवले. दारूगोळा ताब्यात आल्यामुळे शत्रूसैन्याला होणारा त्याचा पुरवठा थांबला. या शौर्याबद्दल सुभेदार मेजर, मानद कॅप्टन विश्वनाथ भोसले यांना ‘वीरचक्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. भ भोसले, शामू चंद्राप्पा भूसेना - नाईक वीरचक्र १ जुलै १९३५ | कोल्हापूर जिल्ह्यातील सालस्मी या छोट्याशा गावात शामू चंद्राप्पा भोसले । यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण करून दि. १६ जानेवारी १९५७ या दिवशी शामू भोसले लष्करात दाखल झाले. | १९७१ च्या भारत-पाक युद्धात भारताच्या पूर्व क्षेत्रातील, एका पहा-याच्या चौकीवर दि. ११ डिसेंबर १९७१ रोजी शामू भोसले यांना तैनात होण्याचा आदेश मिळाला. त्यांची चौकी असलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचणार, इतक्यात त्यांनी चौकीच्या दिशेने शत्रुसेनेची तुकडी जाताना पाहिली. त्यांच्या सेनेने शत्रुसैन्यावर हल्ला चढविला. त्या वेळी नाईक भोसले यांच्यापासून जेमतेम १५ मार्ड अंतरावर शत्रूचे अंदाजे ४५ सैनिक आपापल्या वाहनांतून उड्या मारून उतरले व त्यांच्यात शिल्पकार चरित्रकोश