पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भोसले, शामू चंद्राप्पा संरक्षण खंड धुमश्चक्री उडाली. भोसले यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या हलक्या मशीनगनच्या साहाय्याने त्या सैनिकांवर हल्ला चढविला. त्यांनी शत्रूच्या १५ सैनिकांना यमसदनी पाठविले. त्यांचा हा भीमपराक्रम पाहून उर्वरित सैन्य गोंधळून प्राणभयाने माघारी पळू लागले. नंतर शत्रूने जोमाने प्रतिहल्ला चढविला. तेव्हा भोसले यांनी आपल्या सैनिकांचे मनोधैर्य वाढवून त्यांना प्रोत्साहन दिले आणि हा हल्लाही मोडून काढला. या त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना ‘वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. । भ ५४८ शिल्पकार चरित्रकोश