पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड तेजिंदरसिंग, हरबन्ससिंग तेजिंदरसिंग हरबन्ससिंग भूसेना - ब्रिगेडियर वीरचक्र १ डिसेंबर १९४८ तेजिंदर सिंग यांचा जन्म पुणे येथे झाला. फिरोजपूर येथे आर.एस.डी. महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. ते दि. १५ मार्च १९७० या दिवशी १०४ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. दि. ९ डिसेंबर १९७१ या दिवशी शक्करगढ़ परिसरातील सुरुंग क्षेत्राची टेहळणी करण्यासाठी त्यांना प्रमुख नेमण्यात आले. बंदुका आणि तोफखान्यांची तुकडी यांच्या सहाय्याने त्यांनी ही कामगिरी पार पाडून शत्रूची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळविली. जो मार्ग सुरुंगामुळे खराब झाला होता, तो मार्ग त्यांनी एकट्याने मोकळा करून तो दुरुस्त करण्यास मदत केली. दि. ९ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना वीरचक्र पुरस्कार जाहीर झाला. त्रिहोन, मुरलीलाल महेशदास वायुसेना - एअर कमोडोर वीरचक्र । २३ सप्टेंबर १९३३ मुरलीलाल महेशदास त्रिहोन यांचा जन्म गुजरातमधील सादुल्लाहपूर येथे झाला. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर दि. १४ ऑक्टोबर १९५३ रोजी ते वायुसेनेत दाखल झाले. १९७१ च्या पाकविरुद्धच्या युद्धात विंग कमांडर मुरलीलाल त्रिहोन यांनी पश्चिम विभागामध्ये लढाऊ बॉम्बफेकी विमानांच्या तुकडीचे नेतृत्व केले. त्यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेऊन शत्रुपक्षाचे अनेक रणगाडे नष्ट केले. त्यांच्या तुकडीने शत्रूच्या प्रदेशाची बारकाईने टेहळणी करून शत्रूसैन्याचे नियोजन, हालचाली यांची निश्चित माहिती आणली. या महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे युद्धकाळात मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणीचे काम योग्य प्रकारे झाले. १९७१ च्या संपूर्ण युद्धकाळात विंग कमांडर त्रिहोन यांनी शौर्य गाजवित कौशल्यपूर्ण कामगिरी केली. शिल्पकार चरित्रकोश ५२७