पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड ठाकरे, नारायण पूरमल ठाकरे, नारायण पूरमल भूसेना - लान्स नाईक वीरचक्र २६ एप्रिल १९२२ नारायण पूरमल ठाकरे यांचा जन्म खानदेशातील वालखेडे या गावात झाला. २६ एप्रिल १९४२ रोजी लष्करात प्रवेश करून त्यांनी मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या पॅरा बटालियनमध्ये सेवा करण्यास सुरुवात केली. १९४८च्या पाकिस्तान युद्धामध्ये शिपाई नारायण ठाकरे यांच्या बटालियनला पाकिस्तानच्या एका मोर्चावर पिछाडीवरून हल्ला करण्याचे आदेश मिळाले. शिपाई ठाकरे यांनी त्यांच्या हलक्या मशीनगनने कौशल्याने गोळीबार करून शत्रूच्या काही सैनिकांना ठार केले व शत्रूच्या शस्त्र व दारूगोळ्याच्या साठ्यावर ताबा मिळवला. त्यांच्या बटालियनने शत्रूच्या त्या मोर्चावरही ताबा मिळवण्यात यश मिळविले. याच युद्धात त्यांनी पॅराशूटद्वारे हवेतून पाकिस्तानच्या विमानतळावर हातगोळे टाकून तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला. त्यात बरेच पाक सैनिक ठार झाले. स्वत:चा जीव धोक्यात घालून शिपाई नारायण ठाकरे यांनी बजावलेल्या या कामगिरीमुळे आपल्या सैन्याला हा विजय मिळवणे शक्य झाले. या कामगिरीबद्दल शिपाई नारायण ठाकरे यांना ६ फेब्रुवारी १९४८ रोजी वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिल्पकार चरित्रकोश ५२५