पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड चोप्रा, मनमोहन चेतराम चढवला. मेजर चोप्रा यांनी न डगमगता आपली बाजू धरून ठेवली व तीन रणगाड्यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. हे करत असताना शत्रूच्या एका तोफगोळ्याने त्यांच्या रणगाड्याचा वेध घेतला आणि ते स्वतः गंभीर जखमी झाले. या जखमांमुळेच नंतर त्यांन वीरमरण प्राप्त झाले. मेजर मनमोहन चोप्रा यांनी धाडस, निष्ठा आणि जिद्दीचे सर्वोच्च प्रदर्शन घडविले. या कामगिरीबद्दल त्यांना दि. १९ सप्टेंबर १९६५ रोजी 'वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. च । शिल्पकार चरित्रकोश ५११