पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चोप्रा, मनमोहन चेतराम संरक्षण खंड जिवावर उदार होऊन बजावलेल्या या कामगिरीबद्दल लेफ्टनंट कमांडर प्रकाश चंदावरकर यांना दि. १४ एप्रिल १९८८ रोजी 'वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. चव्हाण, अंकुश महादेव भूसेना - सुभेदार वीरचक्र । ४ नोव्हेंबर १९४० | अंकुश महादेव चव्हाण यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील नरड्वे या छोट्याशा गावात झाला. दि. ४ नोव्हेंबर १९६२ रोजी त्यांनी सैन्यदलात प्रवेश केला. एकोणिसाव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीत त्यांची नेमणूक झाली. १९७१ च्या बांगलादेश युद्धात एका चकमकीत नाईक अंकुश चव्हाण यांच्यावर त्यांच्या तुकडीच्या डाव्या बगलेकडील फळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी होती. या चकमकीदरम्यान त्यांच्या तुकडीतील हलकी मशीनगन चालवणारे दोन्ही जवान गंभीर जखमी झाले. अशा प्रसंगी चव्हाण यांनी स्वयंचलित मशीनगन ताब्यात घेतली व लक्ष्य पूर्ण करेपर्यंत मारा चालू ठेवला. चकमकीच्या दुस-या दिवशीही त्यांच्या मान्याने शत्रूचे अतोनात नुकसान झाले. या युद्धादरम्यान चव्हाण यांनी दाखवलेल्या उच्चतम शौर्य, निष्ठा आणि जिद्द या गुणांसाठी दि. १३ डिसेंबर १९७१ रोजी ‘वीरचक्र' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. चोप्रा, मनमोहन चेतराम भूसेना - मेजर वीरचक्र । २० मार्च १९२६ मनमोहन चेतराम चोप्रा यांचा जन्म जम्मू आणि काश्मीर राज्यातील जम्मू तावी येथे झाला. त्यांचे वडील चेतराम चोप्रा हे पुढे पुण्यास येऊन स्थायिक झाले. | दि. २१ डिसेंबर १९४७ पासून त्यांनी भूसेनेतील सातव्या लाइट कॅव्हॅलरीमध्ये सेवेस सुरुवात केली. | दि. १९ सप्टेंबर १९६५ रोजी छाथनवालावर हल्ला करणारा तुकडीमध्ये त्यांचा समावेश होता. त्यांच्या तुकडीने तोफखान्याच्या मदतीने छाथनवालावर हल्ला चढवला. त्या वेळी आपले काही रणगाडे, ज्यामध्ये मेजर मनमोहन चोप्रांच्या रणगाड्याचा समावेश होता, एका फसव्या भूभागात अडकून पडले होते. शत्रूने संधीचा फायदा घेत या रणगाड्यांवर तोफखान्याच्या साहाय्याने जोरदार हल्ला शिल्पकार चरित्रकोश ५१८