पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड रोमण, सुनील मारुती व सुरुंग काढून टाकण्याचे काम सांगितले गेले. शत्रुसैन्याकडून तुफान गोळीबार होत असताना राणे व त्यांच्या सहकार्‍यांना हे काम करावे लागले. झालेल्या तुफान गोळीबारात त्यांच्या पथकातील दोन माणसे मरण पावली आणि राणेंसहित चारजण जखमी झाले. त्याही अवस्थेत राणे यांनी आपल्या तुकड्यांची पुनर्रचना केली. रणगाडे जाण्यासाठी सुयोग्य रस्ते करण्याचे काम सुरू केले. शत्रूकडून होणार्‍या प्रचंड गोळीबाराचा सामना करत त्यांनी हे काम केले. ८एप्रिल१९४८ रोजी दुपारी सुरू झालेले हे काम सलग चोवीस तास चालले होते. ९ एप्रिलला दुपारी त्या तयार झालेल्या रस्त्यावरून सैन्य आणि रणगाडे जाऊ लागले. त्या रस्त्यावर पुढे पाइनचे अनेक वृक्ष अडथळा म्हणून टाकले होते. टप्प्याटप्प्याने ते वृक्षही बाजूला सारत त्यांनी रस्ता मोकळा केला. दुर्गम डोंगराळ प्रदेशातले निमुळते रस्ते खुले करण्यासाठी त्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत नेतृत्व केले. काही ठिकाणी पूलदेखील उद्ध्वस्त झालेले होते. राणे व त्यांच्या सहकार्‍यांनी ते पूल बांधले, सुरुंग दूर केले. स्वत: जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी उत्तम नेतृत्व, धैर्य, संयम, आत्मविश्वास, अपार देशप्रेम या गुणांच्या जोरावर अथक प्रयत्नांतून दि.११ एप्रिलच्या रात्री उशिरा, दहा वाजेपर्यंत त्यांनी हे रस्ते सुरक्षित व वाहतुकीसाठी सुयोग्य करण्याचे काम केले. त्यामुळे भारतीय रणगाडे सुरळीतपणे चिंगस येथे पोहोचू शकले. या कार्यासाठी ‘परमवीरचक्र’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. राणे २५ जून १९५८ रोजी मेजर म्हणून निवृत्त झाले. त्यानंतरही म्हणजे दि.७ एप्रिल १९७१ पर्यंत त्यांनी भारतीय सेनेत पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून काम पाहिले. राणे यांचा मृत्यू पुण्याच्या सैनिकी इस्पितळात अल्पशा आजाराने झाला. आज पुण्यातील संगमवाडी भागात त्यांच्या नावाने एक शाळा उभारण्यात आली आहे. - पल्लवी गाडगीळ रोमण, सुनील मारुती भूसेना - लान्स हवालदार शौर्यचक्र अकराव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये असणार्‍या हवालदार सुनील मारुती रोमण यांनी ‘ऑपरेशन रक्षक’ या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता. २ नोव्हेंबर २००२ रोजी जम्मू-काश्मीरमधील पूंछ क्षेत्रातील शोधमोहिमेमध्ये अतिरेकी एका झोपडीत लपल्याचा संशय होता. त्यांच्या शोधासाठी ते एका अधिकार्‍याबरोबर गेले. हे अतिरेकी जिथे लपले होते, त्या झोपडीसदृश ठिकाणाला आग लागली व एक अतिरेकी तिथून बाहेर पडला. त्या वेळेस तत्परतेने हवालदार रोमण यांनी त्या अतिरेक्याला ठार मारले. जळत्या झोपडीतून बाहेर पडण्याचा अतिरेक्यांनी वारंवार प्रयत्न केला. पण त्यांच्या मार्गात आड येऊन रोमण यांनी अतिरेक्यांवर गोळीबार करून त्यांना रोखून धरले. तरीही अंदाधुंद गोळीबार करत सहा अतिरेकी बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यांनी आजूबाजूच्या झाडाझुडपांमध्ये लपण्यासाठी आश्रय घेतला. त्यांच्याकडून होणार्‍या गोळीबाराने जराही विचलित न होता हवालदार रोमण यांनी आपल्या अधिकार्‍याबरोबर त्यांचा शोध सुरूच ठेवला. दगडांच्या मागे लपून बसलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. हवालदार रोमण यांनी सरपटत जाऊन अतिरेक्यांशी समोरासमोर झटापट करून दोन अतिरेक्यांना ठार मारले. या मोहिमेमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून हवालदार रोमण यांनी जो पराक्रम केला, त्यासाठी त्यांना ‘शौर्यचक्र’ प्रदान करण्यात आले. - संपादित

  • * *

शिल्पकार चरित्रकोश ४८१